मुंबई – अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय सुरु करावा अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. त्याबाबत मनसेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र मनसे आणि अॅमेझॉन हा वाद आता चिघळण्याची शक्यता आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी कोर्टाकडून नोटीस बजावण्यात आली आहे.
मनसेनं अॅमेझॉनविरोधात मराठी भाषेवरुन एक मोहीम सुरु केली आहे. त्यावर अॅमेझॉन कोर्टात गेलं. त्यावरुन दिंडोशी कोर्टाकडून राज ठाकरे आणि मनसे सचिवांना नोटीस बजावण्यात आलीय. त्यांना 5 जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आला आहे.
अॅमेझॉनकडून दबावतंत्राचा वापर करण्यात येत आहे. असं असलं तरी मनसेची ही मोहीम सुरुच राहील. कारण ही मोहीम मराठी माणसांची, मराठी भाषेसाठी आहे. तसंच कोर्टानं जी नोटीस दिली आहे. त्यावरुन आता अॅमेझॉनला परिणाम भोगावे लागतील, असा इशारा मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी दिलाय.