IMPIMP

‘शटअप या कुणाल’ मध्ये संजय राऊत लावणार हजेरी ! होणार मोठे गौप्यस्फोट

 

मुंबई : ‘शटअप कुणाल’ या पॉडकास्टच्या दुसऱ्या पर्वाचे पहिले पाहुणे म्हणून खासदार संजय राऊत सहभागी होणार असतील तरच मी पुन्हा सुरु करेन, अन्यथा कुणालाही संधी नाही’ असं ट्वीट कुणाल कामरानं नुकतचं केलं होत. यानंतर राऊत आणि कुणाल कामरा यांच्यात फोनवर बोलणं झालं आहे. मुंबईत खारमधील स्टुडिओमध्ये येत्या रविवारी ‘शटअप या कुणाल’ या पॉडकास्ट मुलाखतीचे चित्रीकरण होणार आहे.

शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा याचे निमंत्रण स्वीकारलं आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापनेत संजय राऊत यांची महत्वाची भूमिका आहे त्यामुळे राऊत यांना कामरा नेमकं कोणते कोणते प्रश्न विचारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत, अभिनेत्री कंगना राणावत, अभिनेत्री रिया चक्रवती आदी विषयावर संजय राऊत काय बोलणार, याविषयी उत्सुकता आहे. प्रसारमाध्यमांमध्ये सतत वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असलेले खासदार संजय राऊत यांना कुणाल कोणते प्रश्न विचारणार, त्याला संजय राऊत हे आपल्या नेहमीच्या शैलीत उत्तर देऊन राजकीय क्षेत्रात काय गैाप्यस्फोट करणार हे ‘शटअप कुणाल’ मधून लवकरच स्पष्ट होईल.

कुणाल कामराने यूट्यूबवर 2017 मध्ये हा कार्यक्रम सुरु केला होता. आतापर्यंत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार, शिवसेना खासदार प्रियांका चतुर्वेदी, जेएनयू विद्यार्थी नेते कन्हैया कुमार आणि उमर खलिद, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी, गीतकार जावेद अख्तर, काँग्रेस नेते मिलिंद देवरा, खासदार तेजस्वी सुर्या, मधुकिश्वर देसाई आदी नेते सहभागी झाले आहेत.

 

Read Also