मुंबई : माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम आहे, मध्ये-मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले होते. या विधानानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात पण ती कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेलं असतं, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.
फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे खूप चांगली कार चालवतात; पण ते कार जेव्हा चालवत असतात तेव्हा सगळं ट्राफिक थांबलेले असते. त्यामुळे ती कार व्यवस्थित चालते. असे सरकार चालवता येत नाही. सरकारकडे ट्रॅफिक सुरुच राहत असते. त्यामुळे याबाबत जनताच त्यांना योग्य उत्तर देईल, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर दिले.
दरम्यान, परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे. माझ्या हाती राज्याचं स्टेअरिंग भक्कम आहे. कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित सुरु आहे. पुढे कोण बसलं आहे आणि मागे कोण बसलं आहेहे महत्वाचं नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे. सर्वजण मिळून काम करत आहोत, असे म्हटले होते.
Read Also :
- ‘आप’ने महाराष्ट्रात उघडले खाते, मराठीत ट्विट करत केजरीवाल म्हणाले…
- विना अपघात सेवा देणार्या एसटी चालकांना मिळणार मोठे बक्षीस, अनिल परब यांची घोषणा
- मुस्लिम समाजाच्या ‘किसानबाग’ आंदोलनामुळे आरएसएस-भाजपच्या जातीवादी राजकारणाला शह मिळेल – प्रकाश आंबेडकर
- आठवड्यातील चार दिवस होणार कोरोना लसीकरण, मुख्यमंत्र्यांची माहिती
- ‘माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम’, उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य