मुंबई : माझ्या हाती राज्याचे स्टेअरिंग भक्कम आहे, मध्ये-मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ता सुरक्षा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 32 व्या राज्य रस्ता सुरक्षा महिन्याचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाल की, कार आणि सरकार दोन्ही व्यवस्थित सुरु आहे. पुढे कोण बसलं आहे आणि मागे कोण बसलं आहेहे महत्वाचं नाही. कार आणि सरकार दोन्ही सुरळीत सुरु आहे. सर्वजण मिळून काम करत आहोत.
सध्या कार आणि सरकार दोन्ही चालवत आहे. मध्ये मध्ये खड्डे आणि अडचणी येत आहेत, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, माझ्या हाती स्टेअरिंग भक्कम आहे, असे वक्तव्य त्यांनी केले.
राज्यातील अपघातग्रस्त जागा, वळणे लक्षात घेऊन अशा ठिकाणी ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी करण्यात यावी. राज्यात अपघात होऊच नयेत म्हणून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असून वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करावे, असे आवाहन देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमात केले.
Read Also :
- अर्णब गोस्वामी ‘चॅट’प्रकरणाची चौकशी करा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
- ‘पंतप्रधानांना आव्हान देण्याची धानोरकरांची ऐपत नाही, आधी पक्षाची स्थिती बघावी’
- ‘सत्तास्थापनेसाठी थेट शरद पवारांशी चर्चा झाली होती’, फडणवीसांचा गौप्यस्फोट
- ‘मतांच्या चिंतेमुळेच शिवसेनेने ‘नामांतरा’चा सामना सुरू केला’, थोरातांचे जोरदार उत्तर
- ‘तथाकथित पत्रकार पंतप्रधान कार्यालयाचा खेळण्याप्रमाणे वापर करत आहे’