महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यातील एका गाडीला काल रात्री जळगावकडे जात असताना अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. जळगावजवळील महामार्गावर नशिराबाद येथे फडणवीस यांच्या ताफ्यातील गाडीचे ब्रेक फेल होऊन गाड्यांची एकमेकांना धडक झाली. भालोदहून परतत असताना हा अपघात झाला.
नाशिक आणि मालेगांवचा दौरा आटोपून आम्ही जळगावकडे जात असताना विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या वाहनाला किरकोळ अपघात झाला.
स्वतः प्रवीण दरेकर आणि इतरही सर्वच जण सुरक्षित आहेत.
काळजी करण्यासारखे काहीही नाही.— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 8, 2020
ताफ्यातील एका गाडीने पुढे असणाऱ्या विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला धडक दिली. यामध्ये गाडीचे नुकसान झाले. मात्र कोणालाही दुखापत झालेली नाही. सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर दिली.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस दोन दिवस जळगाव दौऱ्यावर आहेत. ते जळगावमधील रुग्णालयांना भेट देऊन कोरोना व्हायरसच्या स्थिती संदर्भात माहिती घेणार आहेत.