कोरोना व्हायरस संकटाच्या काळात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील नागरिकांच्या सुविधेसाठी महापालिकेचे प्रयत्न सुरू असून सीएसआरच्या माध्यमातून बाणेर येथे सहा मजली कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या सेंटरचा लोकार्पण सोहळा आज 11 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहे.
याशिवाय पिंपरी चिंचवड येथील मोरवाडी मोरवाडी ऑटो क्लस्टर येथे कोविड सेंटरचे उद्घाटन देखील आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होईल. सकाळी 10.30 वाजता या सेंटरचे उद्घाटन होईल. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील,महापौर माई ढोरे, आमदार महेश लांडगे , आमदार लक्ष्मण जगताप, महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित असतील.
दोनच दिवसांपूर्वी अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या मैदानात उभारलेल्या हजार बेडच्या रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पध्दतीने करण्यात आले. दोन ठिकाणी प्रशस्त सोयीसुविधांनी रुग्णालये सुरू झाल्याने जिल्ह्यातील रुग्णांची मोठी सोय होणार आहे.