मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांच्या भेटीला पोहचले आहे. 2 जानेवारी रोजी धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाल्याने त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर 15 दिवसानंतर धनंजय मुंडे यांना ब्रीच कॅंन्डी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील धनंजय मुंडे यांची भेट घेतली होती.
परळीत धनंजय मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला होता. या अपघात त्यांच्या डोक्याला, छातीला, पायाला जबर मार बसला होता. सुरूवातीला त्यांना परळीतील एका खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅंन्डी रूग्णालयात उपचार केलेत. मग 15 दिवसानंतर त्यांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले असून आज धनंजय मुंडे यांच्या घरी देवेंद्र फडणवीस तब्येतीची विचारपुस करण्यासाठी गेले.
धनंजय मुंडे यांनी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते म्हणाले की, आज ब्रीच कॅंन्डी रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. डॉक्टरांनी पुढील काही दिवस सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला असल्याने काही दिवस मुंबईतील निवासस्थानी विश्रांती घेणार असून या काळात आपल्याला भेटता येणार नाही. मात्र लवकरच आपल्या सर्वांना भेटायला व जनसेवेत रूजू व्हायला परळीला येईन. मी रूग्णालयात असताना राजकीय, सामाजिक , अध्यात्मिक, पत्रकारिता आदी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी व माझ्या सर्व सहकाऱ्यांनी माझी काळजी व्यक्त करत विचारपुर केली. त्या सर्वांचे तसेच रूग्णालयातील सर्व डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचेही मनापासून आभार असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
Read also
- “सत्ताधारी आमचे शत्रू नाही..!”पार्थ पवार-शंभुराज देसाईंच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
- पुण्यात भाजपचं ‘ऑपरेशन कमळ’ फुलणार..! काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीचे 30 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर
- बाळासाहेबाच्या तैलचित्राचं अनावरण विधानसभेत, ठाकरे अन् शिंदे आमनेसामने येणार का ?
- “आमदार थोरात हे भाची समजून आपल्या मागे उभे राहतील”; शुंभागी पाटलांचा विश्वास, काल गेटवरूनच परतल्या
- निवडणुक आयोगासमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद , निर्णय काय?