पुणे : आगामी काळात पिंपरी चिंचवड, पुणे, मुंबई आणि नाशिक सारख्या मोठ्या शहरात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्याची तयारी देखील स्थानिक नेत्यांनी सुरू केली आहे. या सर्व महापालिकेत सत्ता राखण्यासाठी सत्ताधारी जोरदार कसरत करतांना दिसत असून पक्षप्रवेश देखील मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यातच आता पुण्यात राष्ट्रवादी अन् काॅंग्रेसमध्ये मोठा भुंकप होणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
“याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली”; भाजपची राऊतांवर टिका
मागील दोन ते तीन आठवड्यापुर्वी एका बड्या माजी नगरसेवकांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यामुळे भाजपात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होण्याचं संकेत मिळत आहेत. यातच सहा महिन्यापूर्वी पुण्यातल्या भाजपमधून तब्बल 25 माजी नगरसेवक राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वाटेवर होते. मात्र मध्येच सत्तांतरण झाल्याने राजकीय समीकरण बदलून सगळचं चित्र पलटलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुक…! भाजप-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनचा डाव ठाकरे गट रोखणार का?
त्यामुळे आता पुण्यातील राष्ट्रवादी आणि काॅंग्रेसमधील 20 ते 30 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे भाजपने पुण्यात लोटस कमळची योजना आखली असून येत्या काही दिवसात याचं चित्र स्पष्ट होणार असल्याची माहिती काही सुत्रांकडून मिळाली आहे. सध्या पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत भाजपची सत्ता असून आगामी काळात त्यांना राष्ट्रवादीसोबत मोठी टक्कर होण्याची शक्यता आहे.
कसब्यातील पोटनिवडणुक गाजणार..! काॅंग्रेस अन् भाजपमध्ये जोरदार लढत ?
दरम्यान, पिंपरी चिंचवड महापालिकेची जबाबदारी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीने दिली आहे. यासाठी अजित पवार पुण्यातील दोन्ही महापालिकेवर लक्ष्य ठेऊन आहे. यासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी बैठकाही सुरू आहेत. त्यामुळे दोन्ही महापालिकेची निवडणुकीत मोठी चुरस बघायला मिळणार आहे.
Read also
- बाळासाहेबाच्या तैलचित्राचं अनावरण विधानसभेत, ठाकरे अन् शिंदे आमनेसामने येणार का ?
- “आमदार थोरात हे भाची समजून आपल्या मागे उभे राहतील”; शुंभागी पाटलांचा विश्वास, काल गेटवरूनच परतल्या
- निवडणुक आयोगासमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद , निर्णय काय?
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर