मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या मुंबई महापालिकेच्या विकास कामांच्या लोकार्पणातून गुरूवारी भाजप-बाळासाहेबांची शिवसेना युतीने मिशन मुंबईचे रणशिंग फुंकले. मुंबई महापालिकेच्या निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी दादरपासून ते वांद्यापर्यंत ठिकठिकाणी झळकलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भलेमोठे कटआऊट्स आणि झेंड्यांच्या माध्यमातून महापालिका निवडणुकांच्या जय्यत तयारीची झलक मुंबईकरांना पाहायला मिळाली आहे.
शुंभागी पाटलांना आघाडीचा पाठिंबा जाहीर, तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काॅंग्रेसमधून निलंबित
त्यानंतर विकासकामांच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वांद्रे येथील बीकेसी मैदानावरील जाहीर सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली. मुंबई आणि मुंबईकर डोळ्यांसमोर ठेवूनच सभास्थळी ठिकठिकाणी मुंबई मेट्रो, मलनिस्सारण प्रकल्पस रस्यांचे विकास प्रकल्प तसेच विविध विकासकामांचे पोस्टर्स यांनी मुंबईकरांना शाश्वत विकासाची ग्वाही देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
“माझी काळजी घेतलेल्या सगळ्यांचे आभार..!” धनंजय मुंडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
राज्यात आणि देशात डबल इंजिन सरकार असून या इंजिन तिसरा डबा जोडला तर मुंबईचा विकास झपाट्याने वाढेल. तसेच शिंदे अन् फडणवीस सरकार आल्यापासून मुंबईचा कायापलट होत आहे. असं प्रतिपादन मोदींनी काल सभेत केलं आहे. तसेच एकनाथ शिंदे यांनी देखील ट्रिबल इंजिन सरकारचा उल्लेख केला. त्यावरून मुंबई महापालिकेची निवडणुक लवकरच लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“राज्य सरकारचा कारभार म्हणजे, काखेत कळसा अन् गावाला वळसा”
दरम्यान, एकनाथ शिंदेंनी शिवसेनेविरोधात बंडाळी केल्याने उद्धव ठाकरेंना याचा मोठा फटका बसला आहे. यातच मागील काही वर्षापासून मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी भाजप प्रयत्न करीत आहे. शिंदेंच्या बंडाळीने त्यांना ही निवडणुक सोपी जाण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे ठाकरेंकडे सहानुभूतीची लाट असून सत्ता पुन्हा ताब्यात घेण्यासाठी ठाकरे गटही कोणतीही कसर सोडणार नाही.
Read also
- कसब्यातील पोटनिवडणुक गाजणार..! काॅंग्रेस अन् भाजपमध्ये जोरदार लढत ?
- “मोदींचं भाषणं ऐकून मिठी नदीही हसली असेल अन् खारा समुद्रही गोड झाला;” राष्ट्रवादीने डिवचलं
- “BMC ची 3 हजार कोटीची एफडी शिंदे फडणवीसांनी मोडली, मोदींना तशी परिस्थिती करायचीय का?”
- मोदींचा मुंबई दौरा..! बीकेसीच्या भाषणांतून मोदींनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले
- “संरपचं पदापासून सगळ्याचं निवडणुकांसाठी मोदींची धावपळ, मला त्यांची काळजी वाटते;” सुप्रिया सुळे