मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर असून भाजपकडून मिशन मुंबई महापालिकेचा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण होणार आहे. त्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. तसेच आज सायंकाळी बीकेसी मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार असून भाजपकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना टोला हाणला आहे.
महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येत असल्याने त्यांचं आम्ही स्वागतच करतो. या भाजपमध्ये अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, अरूण जेटली, यशवंत सिन्हा, सुष्मा स्वराज यांच्यासारखे मोठे नेते पाहिले आहे. मात्र आज यांसारखे नेते भाजपकडे नाहीत. हे पाहून वाईट वाटत आहे. तसेच बिचारे पंतप्रधान नरेंद्र मोदीची काळजी वाटते की, सरपंचपदाच्या निवडणुकापासून देशातील कोणत्याही निवडणुकांसाठी मोदींना धावपळ करावी लागते आणि ते पक्षासाठी खुप कष्ट घेतात. तसेच प्रत्येत निवडणुकामध्ये नरेंद्र मोदींशिवाय भाजपकडे दुसरा नेता किंवा पर्याय नाही. असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
नरेंद्र मोदींचा मुंबई दौरा..! तब्बल 38, 000 कोटी रूपये खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन अन् पायाभरणी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दावोस दौरा आणि ज्या प्लेनने आले. ते पाहून खुप छान वाटले. त्या दौऱ्यातील जे फोटो माझ्या पाहण्यात आले. त्या मधील काही उद्योजक हैदराबाद येथील आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना दावोसला जाण्याची गरजच नव्हती. ते उद्योजक हैदराबाद येथून मुंबईत आले असते आणि तिथे करार झाले असते. असंही त्या म्हणाल्या.
Read also
- शुंभागी पाटलांना आघाडीचा पाठिंबा जाहीर, तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काॅंग्रेसमधून निलंबित
- “माझी काळजी घेतलेल्या सगळ्यांचे आभार..!” धनंजय मुंडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
- “राज्य सरकारचा कारभार म्हणजे, काखेत कळसा अन् गावाला वळसा”
- “..म्हणून एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार”; अनिल देशमुख लवकरच भेटीला
- आजोबांकडून सतत अन्याय होत असल्याची भावना, त्यामुळेच पार्श पवार अन् शंभुराज देसाईंची भेट