मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मुंबईत विविध विकासकामांची पायाभरणी केली. त्यानंतर त्यांनी बीकेसीवर जाहीर सभा घेत विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच आता मुंबईचा कायापालट होत आहे. मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठा वाटा असल्याचं सांगत त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टिका केली आहे.
“राज्य सरकारचा कारभार म्हणजे, काखेत कळसा अन् गावाला वळसा”
काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय. मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकून मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल. मात्र 2016 साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या समुद्रातील भव्य स्मारकाच्या भूमीपुजनासाठी आणलेल्या गड-किल्ल्यांवरील पवित्र मातीने नक्कीच मुक अश्रू ढाळले असतील आणि अरबी समुद्रातील त्या खडकानेही आश्चर्याने कान टवकारले असतील. असा खोचक टोला रोहित पवार यांनी नरेंद्र मोदी यांना लगावला.
“..म्हणून एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार”; अनिल देशमुख लवकरच भेटीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2016 मध्ये अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य स्मारकाचं भूमीपुजन केलं होतं. मात्र त्यावर अद्यापही कोणतंही काम करण्यात आलं नाही. त्यातच काल मंबईत नरेंद्र मोदी यांनी जवळपास 38000 कोटी रूपयांच्या विकास कामांचं भूमीपुजन आणि उद्घाटन केलं आहे. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपला डिवचलं आहे.
काल मुंबईतील कार्यक्रम पाहून हा प्रकल्पांच्या लोकार्पणाचा कार्यक्रम होता की एकमेकांचा कौतुक सोहळा होता हेच कळेनासं झालंय! मला तर वाटतं या कार्यक्रमातील भाषणं ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल! pic.twitter.com/NXuCGmQcQb
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 20, 2023
Read also
- “BMC ची 3 हजार कोटीची एफडी शिंदे फडणवीसांनी मोडली, मोदींना तशी परिस्थिती करायचीय का?”
- मोदींचा मुंबई दौरा..! बीकेसीच्या भाषणांतून मोदींनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले
- “संरपचं पदापासून सगळ्याचं निवडणुकांसाठी मोदींची धावपळ, मला त्यांची काळजी वाटते;” सुप्रिया सुळे
- शुंभागी पाटलांना आघाडीचा पाठिंबा जाहीर, तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काॅंग्रेसमधून निलंबित
- “माझी काळजी घेतलेल्या सगळ्यांचे आभार..!” धनंजय मुंडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज