मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मुंबईत विविध विकासकामांची पायाभरणी केली. त्यानंतर त्यांनी बीकेसीवर जाहीर सभा घेत विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. तसेच आता मुंबईचा कायापालट होत आहे. मुंबईच्या विकासात स्थानिक स्वराज्य संस्थांचा मोठा वाटा असल्याचं सांगत त्यांनी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे युवा कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांनी भाजपवर टिका केली आहे.
“..म्हणून एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार”; अनिल देशमुख लवकरच भेटीला
जवळपास 90 हजार कोटीची एफडी महानगरपालिकेकडे आहे. सगळे पैसे एकदाच खर्चून टाकले की दिल्ली महानगरपालिकेसारखी परिस्थिती होईल. रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे सुद्धा महिनोंमहिने हालणार नाहीत. दिल्लीत वॉटर बोर्ड ची वीज सुद्धा कापली जाते. वीज बिल भरायला पैसे नाहीत म्हणून तशी परिस्थिती मोदी यांना मुंबईची करायची आहे. नोव्हेंबर महिन्यात 3 हजार कोटीची एफडी शिंदे फडणवीस यांनी मोडली आहे. त्यांनी काय साध्य केलं याचं उत्तर ते देतील का असा सवालही त्यांनी केला आहे.
“विकासासाठी दिल्ली ते महाराष्ट्र ते मुंबई एकच सरकार हवंय”; पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्याआधी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल सांयकाळी मेट्रो 2 अ आणि मेट्रो 7 चे लोकार्पण करण्यात आले यानिमित्ताने वांद्रे-कुर्ला संकुल, एमएमआरडीए मैदान, मेट्रो मार्गिका 7, गुंदवली स्थानक ते मोगरापाडा मेट्रो स्थानक या ठिकाणी पंतप्रधानाचा दौरा आयोजिक केला. त्यामुळे या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच, दहशतवादी हल्ल्याबाबत सतर्कता जारी करण्यात आली आहे. ड्रोन आणि छोट्या विमानाने दहशतवादी हल्ला करू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी जारी केलेल्या आदेशानुसार, पोलिसांच्या परवानगीशिवाय आकाशात ड्रोन, पॅरा ग्लायडर किंवा छोटी विमाने उडवण्यास बंदी करण्यात आली.
जवळपास 90 हजार कोटीची FD महानगरपालिकेकडे आहे.सगळे पैसे एकदाच खर्चून टाकले की दिल्ली महानगरपालिकेसारखी परिस्थिती होईल.रस्त्यावर कचर्याचे ढिगारे सुद्धा महिनोंमहिने हालणार नाहीत.दिल्लीत Water board ची वीज सुद्धा कापली जाते वीज बिल भरायला पैसे नाहीत म्हणून ..
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) January 20, 2023
Read also
- मोदींचा मुंबई दौरा..! बीकेसीच्या भाषणांतून मोदींनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले
- “संरपचं पदापासून सगळ्याचं निवडणुकांसाठी मोदींची धावपळ, मला त्यांची काळजी वाटते;” सुप्रिया सुळे
- शुंभागी पाटलांना आघाडीचा पाठिंबा जाहीर, तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काॅंग्रेसमधून निलंबित
- “माझी काळजी घेतलेल्या सगळ्यांचे आभार..!” धनंजय मुंडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
- “राज्य सरकारचा कारभार म्हणजे, काखेत कळसा अन् गावाला वळसा”