पुणे : अलिकडेच निवडणुक आयोगाने कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड येथील विधानसभेची पोटनिवडणुक जाहीर केली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचं निधन झाल्याने या दोन्ही जागा रिक्त झाल्या आहेत. यातच आता या जागांवर कोणाला उमेदवारी देण्यात येईल. याची उत्सुकता सगळ्यांना लागून राहिली आहे. तर कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणुक काॅंग्रेस लढवणार असल्याची माहिती काॅंग्रेसचे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितले आहे.
“माझी काळजी घेतलेल्या सगळ्यांचे आभार..!” धनंजय मुंडेंना रूग्णालयातून मिळाला डिस्चार्ज
आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर त्यांचे पती शैलेश टिळक ही पोटनिवडणुक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे ही पोटनिवडणुक बिनविरोध होईल की नाही? यावर चर्चा सुरू असतांना काॅंग्रेसने मध्येच बॉम्ब टाकला आहे. काॅंग्रेसचा उमेदवार कसब्यातून निवडणुक लढविणार आहे. त्यामुळे ही निवडणुक गाजणार आहे. महाविकास आघाडी म्हणूनही आम्ही निवडणूक लढविणार असं अरविंद शिंदे यांनी सांगितले आहे.
“राज्य सरकारचा कारभार म्हणजे, काखेत कळसा अन् गावाला वळसा”
तर दुसरीकडे राष्ट्रवादीच्या उपनेत्या रूपाली पाटील देखील ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यानंतर त्यांनी आपण निवडणुक लढविण्यासाठी तयार असल्याचं सांगितले होतं. परंतु त्याच दरम्यान राष्ट्रवादीचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी ही निवडणूक बिनविरोध होईल असं जाहीर केलं होतं. त्यामुळे या निवडणुकीकरीता कोण उमेदवार असणार त्याकडे लक्ष्य लागून राहिलंय.
“..म्हणून एकनाथ शिंदे अन् देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार”; अनिल देशमुख लवकरच भेटीला
दरम्यान, पिंपरी चिंचवडमध्येही भाजप लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. जर शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी दिली तर राष्ट्रवादी आपला उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ह्या दोन्ही ठिकाणी पंढरपुर, कोल्हापुर, सोलापुर आणि अंधेरी पोटनिवडणुकीसारखी निवडणूक बिनविरोध न होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read also
- “मोदींचं भाषणं ऐकून मिठी नदीही हसली असेल अन् खारा समुद्रही गोड झाला;” राष्ट्रवादीने डिवचलं
- “BMC ची 3 हजार कोटीची एफडी शिंदे फडणवीसांनी मोडली, मोदींना तशी परिस्थिती करायचीय का?”
- मोदींचा मुंबई दौरा..! बीकेसीच्या भाषणांतून मोदींनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले
- “संरपचं पदापासून सगळ्याचं निवडणुकांसाठी मोदींची धावपळ, मला त्यांची काळजी वाटते;” सुप्रिया सुळे
- शुंभागी पाटलांना आघाडीचा पाठिंबा जाहीर, तर अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे काॅंग्रेसमधून निलंबित