मुंबई : राजकीय पक्ष म्हणून आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे. पक्ष संघटनात्मक संख्याबळ आणि लोकप्रतिनिधींची संख्याबळ यात फरक आहे. त्यामुळे सादिक अलि केस या प्रकरणात लागू होत नाही. असा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकिल देवदत्त कामत यांनी केला. त्यावर प्रतिनिधी सभा ही फक्त तुमच्याकडे कशी होऊ शकते. असा सवाल करीत शिदे गटाचे वकिल मेहश जेठमलानी यांनी पलटवार केला. सध्या निवडणुक आयागोसमोर दोन्ही गटांचा जोरदार युक्तिवाद सुरू आहे.
एकनाथ शिंदे यांचं मुख्य नेतापद बेकायदेशीर असून मुख्य नेतेपद हे पक्षाच्या घटनेत नाही. त्यामुळे हे पद बेकायदेशीर आहे. तसेच शिंदे गटाच्या संख्येइतकाच ठाकरे गटाचं संख्या हे तुल्यबळ आहे. राजकीय पक्षाचं संख्याबळ ठाकरेंकडेच आहे. असा युक्तिवाद देवदत्त कामत यांनी केलाय. युतीचं आश्वासन देऊन मतं मिळवली नंतर मतदारांना सोडून दिलं. असा युक्तिवाद शिंदे गटाकडून देण्याची शक्यता आहे.
“याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली”; भाजपची राऊतांवर टिका
राष्ट्रीय कार्यकारणी आमच्यासोबत असून याच कार्यकारिणीकडून पक्ष नेत्याची निवड करतात. त्यामुळे शिंदे गटाने नेमलेली राष्ट्रीय कार्यकारीणी बेकायदेशीय, असून एकनाथ शिंदे यांना पक्षाची घटनाच मान्य नाही. मग एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर केला आहे. असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच ठाकरे गटाची कार्यकारीणी बरखास्त होऊ शकत नाही. ती पक्षाच्या घटनेप्रमाणे तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात पतिज्ञापत्र आयोगाला दिली. शिंदेंची प्रतिज्ञापत्र तपासून पाहा असा युक्तिवाद देखील त्यांनी केला आहे.
मुंबई महापालिका निवडणुक…! भाजप-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनचा डाव ठाकरे गट रोखणार का?
त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या अशी ठाकरे गटानी निवडणुक आयोगात मागणी केली आहे.त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारीणी घटनेनुसार या कार्यकारिणीला मुदतवाढ दिली तर पक्षप्रमुख पदाची मुदत वाढेल,असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगात केली आहे. पण शिंदे गटाने ती केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट राजकीय पक्ष नाही. त्यांनी निवडणुक आयोगात कोणतीही पुर्तता केलेली नाही. त्यामुळे शिंदे स्व:तला राजकीय पक्ष म्हणत असेल तरी शिंदे गट राजकीय पक्ष नाही. पक्षाबद्दल सर्व बाबींची पुर्तता आम्ही केलेली असल्याचंही सिब्बल यांनी सांगितलं.
Read also
- राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ जास्त..! निवडणुक आयोगाच्या सुनावणीसमोर ठाकरे गट वरचढ
- “शिंदे गट राजकीय पक्ष नाही, त्यांची याचिकेत खोटी विधाने”; सिब्बल यांनी शिंदे गटाला घेरलं
- अपघातांची मालिका सुरूच, माजी आरोग्यमंत्र्यांचा भीषण अपघात, तात्काळ रूग्णालयात दाखल
- चिंचवड अन् कसब्याच्या पोटनिवडणुकीत फडणवीसांची डोकेदुखी वाढणार का ?
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर