मुंबई : राजकीय पक्ष म्हणून आमचं संख्याबळ विचारात घ्यावं, प्रतिनिधींचा विचार केल्याने आमच्याकडे संख्याबळ जास्त आहे. तसेच पक्ष संघटनात्मक संख्याबळ आणि लोकप्रतिनिधींची संख्याबळ यात फरक आहे.त्यामुळे सादिक अली केस या प्रकरणात लागू होत नाही. असा युक्तिवाद ठाकरे गटातील वकिल देवदत्त कामत यांनी आज निवडणुक आयोगासमोर केला आहे. आज शिवसेना आणि धनुष्यबाण यावर सुनावणी होत आहे.
“याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली”; भाजपची राऊतांवर टिका
सुरूवातीला ठाकरे गटाचे वकिल कपिल सिब्बल याचा युक्तिवाद झाला. त्यानंतर शिंदे गटाचे वकिल महेश जेठमलानी युक्तिवाद करण्यासाठी उभे राहिले असता. त्यांना मध्येच थांबवलं आधी ठाकरे गटाचा युक्तिवाद होऊ द्या, असं आयोगाने म्हटलं. तसेच शिंदे गटाने आतापर्यंत कोणतीही प्रतिनिधी घेतली नाही. त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळावं. कारण मुळ पक्ष आम्हीच आहोत. असा युक्तिवाद कामत यांनी केलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुक…! भाजप-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनचा डाव ठाकरे गट रोखणार का?
शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? या संदर्भात आज निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळा यावर सुनावणी झाली आहे. यातच आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या याचिकेत खोटी विधाने असून हा वाद संसदीय कार्यपद्धतीची थट्टा करत असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटातील वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे आता या सुनावणी कडे सध्या सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
कसब्यातील पोटनिवडणुक गाजणार..! काॅंग्रेस अन् भाजपमध्ये जोरदार लढत ?
राष्ट्रीय कार्यकारणी आमच्यासोबत असून याच कार्यकारिणीकडून पक्ष नेत्याची निवड करतात. त्यामुळे शिंदे गटाने नेमलेली राष्ट्रीय कार्यकारीणी बेकायदेशीय, असून एकनाथ शिंदे यांना पक्षाची घटनाच मान्य नाही. मग एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर केला आहे. असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच ठाकरे गटाची कार्यकारीणी बरखास्त होऊ शकत नाही. ती पक्षाच्या घटनेप्रमाणे तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात पतिज्ञापत्र आयोगाला दिली. शिंदेंची प्रतिज्ञापत्र तपासून पाहा असा युक्तिवाद देखील त्यांनी केला आहे.
Read also
- “शिंदे गट राजकीय पक्ष नाही, त्यांची याचिकेत खोटी विधाने”; सिब्बल यांनी शिंदे गटाला घेरलं
- अपघातांची मालिका सुरूच, माजी आरोग्यमंत्र्यांचा भीषण अपघात, तात्काळ रूग्णालयात दाखल
- चिंचवड अन् कसब्याच्या पोटनिवडणुकीत फडणवीसांची डोकेदुखी वाढणार का ?
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर