मुंबई : मागील गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील आमदारांच्या गाडीच्या अपघांताची मालिका सुरू आहे. यातच आज राज्याचे माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. घोडबंदर येथून पालघरच्या दिशेने प्रवास करत असताना त्यांच्या गाडीला मागून डंपने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. त्यांना त्वरीत मुंबई क्रिटिकेअर रूग्णालयात दाखल कऱण्यासाठी नेण्यात आले आहे.
कसब्यातील पोटनिवडणुक गाजणार..! काॅंग्रेस अन् भाजपमध्ये जोरदार लढत ?
आज सकाळी साडे अकराच्या दरम्यान दीपक सावंत हे घोडबंदरहून पालघरच्या दिशेने प्रवास करीत होते. यावेळी सगनाई नाका येथे पोहचले असताना त्यांच्या गाडीला एका डंपरने मागून धडक दिली आहे. या अपघातात त्यांच्या पाठीला गंभीर दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी काशिमीरा पोलिसांनी धाव घेऊन डंपर चालक इर्शाद शहजाद खान याला ताब्यात घेतले आहे. तर सावंत हे स्वत:च रूग्णावाहिकेने प्रवास करून अंधेरी येथील क्रिटिकेअर रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहेत.
“मोदींचं भाषणं ऐकून मिठी नदीही हसली असेल अन् खारा समुद्रही गोड झाला;” राष्ट्रवादीने डिवचलं
दरम्यान या अपघातांची माहिती मिळताच पोलिसांनी दोन्ही वाहनांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संदीप कदम यांनी दिली आहे.
Read also
- चिंचवड अन् कसब्याच्या पोटनिवडणुकीत फडणवीसांची डोकेदुखी वाढणार का ?
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली”; भाजपची राऊतांवर टिका
- मुंबई महापालिका निवडणुक…! भाजप-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनचा डाव ठाकरे गट रोखणार का?