पुणे : राज्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणकीची घोषणा निवडणुक आयोगाने घोषित केली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांचं आजारपणामुळे निधन झाल्याने पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभेची जागा रिक्त झालीय. त्यामुळे अवघ्या पंधरा दिवसानंतरच पोटनिवडणुक जाहीर झाली असून येत्या 26 फेब्रुवारी रोजी मतदान तर 2 मार्चला मतमोजणी होणार आहे. मात्र ह्या दोन्ही ठिकाणी उमेदवारी कुणाला देण्यात यावी, असा पेच भाजप अन् महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाला आहे.
“मोदींचं भाषणं ऐकून मिठी नदीही हसली असेल अन् खारा समुद्रही गोड झाला;” राष्ट्रवादीने डिवचलं
पिंपरी चिंचवडमध्ये सध्या लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप अन् अश्विनी जगताप यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते राहुल कलाटे, अन् राष्ट्रवादीचे नेते नाना काटे, भाऊसाहेब भोईर हे देखील या पोटनिवडणुकीसाठी इच्छुक आहेत. यातच नाना काटे यांनी 2014 तर शिवसेनेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी 2019 मध्ये पिंपरी चिंचवड विधानसभेची निवडणुक लढविली होती. मात्र दोन्ही वेळेस दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी दोघांना धुळ चारली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत लक्ष्मण जगताप यांना 1,50,723 मतं मिळाली होती. तर अपक्ष म्हणून उभ्या राहिलेल्या राहुल कलाटे यांना 1,12,225 मत मिळवून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 2014 च्या विधानसभेच्या निवडणुकीत राहुल कलाटे यांना 63,489 तर नाना काटे यांना 42,553 मतं मिळाली होती.
“BMC ची 3 हजार कोटीची एफडी शिंदे फडणवीसांनी मोडली, मोदींना तशी परिस्थिती करायचीय का?”
आता याठिकाणी शंकर जगताप यांना भाजपकडून उमेदवारी दिली तर महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच याठिकाणी राष्ट्रवादीकडून नाना काटे यांच्या नावाचीही चाचपाणी सध्या सुरू आहे. त्यामुळे याठिकाणी ही पोटनिवडणुक बिनविरोध न होता थेट भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये होण्याची शक्यता आहे. तर दुसऱ्या बाजूला कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातही अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
भाजप अन् काॅंग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण
काॅंग्रेसचे पुणे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी ही निवडणुक लढविण्याचे सुतोवाच अगोदरच केले आहे. त्यामुळे काॅंग्रेसकडून रविंद्र धंनगेकर, अरविंद शिंदे यांच्या नावाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहे. यातच भाजपकडून हेमंत रासने आणि गणेश बिडकर ही पोटनिवडणुक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवार मुक्ता टिळक यांनी काॅंग्रेसचे उमेदवार अरविंद शिंदे यांचा पराभव केला. त्यावेळी मुक्ता टिळक यांना 50.30 टक्के तर अरविंद शिंदे यांना 31.52 टक्के मतं मिळाली होती.
मोदींचा मुंबई दौरा..! बीकेसीच्या भाषणांतून मोदींनी पालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकले
त्यामुळे कसबापेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने किंवा गणेश बिडकर यांना उमेदवारी दिली तर काॅंग्रेसकडून अरविंद शिंदे किंवा रविंद्र धनगेकर यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणुक बिनविरोध न होता थेट भाजप आणि काॅंग्रेसमध्ये होण्याची शक्यता आहे. दोन्ही ठिकाणी अशा लढती झाल्या तर भाजपला आपली सत्ता टिकवून ठेवण्यासाठी मोठे कष्ट घेण्याची गरज पडणार आहे. कारण कसबा पेठ विधानसभा मतदार संघातील भाजपमध्ये असलेला अंतर्गत वाद सगळ्यांना माहितीय. खासदार गिरीश बापट अन् हेमंत रासने, गणेश बीडकर यांच्यातील वाद भाजपला डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे काॅंग्रेसमध्येही अरविंद शिंदे अन् रविंद्र धनगेकर यांच्या तिकीटावरून धुसफुस सुरू आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पर्याय कोणते ?
पिंपरी चिंचवडमध्ये शंकर जगताप यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे किंवा नाना काटे यांना उमेदवारी देण्याची शक्यता आहे. याठिकाणीही भाजपला मोठी ताकद खर्च करावी लागणार आहे. यातच आगामी काळात महापालिका, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. याचा अवधीही काही महिन्यांपुरता शिल्लक राहिला आहे. त्यामुळे भाजप अन् देवेंद्र फडणवीस या सगळ्यांमधून सोपा मार्गाला पंसती देणार. त्यामुळे ज्या पद्धतीने अंधेरीची पोटनिवडणुक सहानुभूतीच्या लाटेवर झाली तशाच मार्ग याठिकाणी देवेंद्र फडणीस स्विकारण्याची शक्यता असून पिंपरी चिंचवड मध्ये लक्ष्मण जगताप अन् कसबा पेठमधून मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना आपली उमेदवारी देऊन निवडणुक बिनविरोध करण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
Read also
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली”; भाजपची राऊतांवर टिका
- मुंबई महापालिका निवडणुक…! भाजप-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनचा डाव ठाकरे गट रोखणार का?
- कसब्यातील पोटनिवडणुक गाजणार..! काॅंग्रेस अन् भाजपमध्ये जोरदार लढत ?