मुंबई : शिवसेना आणि धनुष्यबाण नेमका कुणाचा? या संदर्भात आज निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळा यावर सुनावणी झाली आहे. यातच आजच्या सुनावणीत शिंदे गटाच्या याचिकेत खोटी विधाने असून हा वाद संसदीय कार्यपद्धतीची थट्टा करत असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटातील वकिल कपिल सिब्बल यांनी केला आहे. त्यामुळे आता या सुनावणी कडे सध्या सगळ्यांचं लक्ष्य लागून राहिलं आहे.
मुंबई महापालिका निवडणुक…! भाजप-शिंदेंच्या ट्रिपल इंजिनचा डाव ठाकरे गट रोखणार का?
राष्ट्रीय कार्यकारणी आमच्यासोबत असून याच कार्यकारिणीकडून पक्ष नेत्याची निवड करतात. त्यामुळे शिंदे गटाने नेमलेली राष्ट्रीय कार्यकारीणी बेकायदेशीय, असून एकनाथ शिंदे यांना पक्षाची घटनाच मान्य नाही. मग एकनाथ शिंदे यांची पक्षनेतेपदाची शपथ कोणत्या आधारावर केला आहे. असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला आहे. तसेच ठाकरे गटाची कार्यकारीणी बरखास्त होऊ शकत नाही. ती पक्षाच्या घटनेप्रमाणे तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात पतिज्ञापत्र आयोगाला दिली. शिंदेंची प्रतिज्ञापत्र तपासून पाहा असा युक्तिवाद देखील त्यांनी केला आहे.
कसब्यातील पोटनिवडणुक गाजणार..! काॅंग्रेस अन् भाजपमध्ये जोरदार लढत ?
त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारिणीला मुदतवाढ द्या अशी ठाकरे गटानी निवडणुक आयोगात मागणी केली आहे.त्याचबरोबर राष्ट्रीय कार्यकारीणी घटनेनुसार या कार्यकारिणीला मुदतवाढ दिली तर पक्षप्रमुख पदाची मुदत वाढेल,असंही त्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीची सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगात केली आहे. पण शिंदे गटाने ती केलेली नाही. त्यामुळे शिंदे गट राजकीय पक्ष नाही. त्यांनी निवडणुक आयोगात कोणतीही पुर्तता केलेली नाही. त्यामुळे शिंदे स्व:तला राजकीय पक्ष म्हणत असेल तरी शिंदे गट राजकीय पक्ष नाही. पक्षाबद्दल सर्व बाबींची पुर्तता आम्ही केलेली असल्याचंही सिब्बल यांनी सांगितलं.
Read also
- अपघातांची मालिका सुरूच, माजी आरोग्यमंत्र्यांचा भीषण अपघात, तात्काळ रूग्णालयात दाखल
- चिंचवड अन् कसब्याच्या पोटनिवडणुकीत फडणवीसांची डोकेदुखी वाढणार का ?
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर
- “याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली”; भाजपची राऊतांवर टिका