पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मंत्री शंभुराज देसाई यांची भेट घेतली. त्यानंतर राज्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली होती. तर राष्ट्रवादीमध्ये पार्श पवार यांची घुसमट होत आहे त्यामुळे त्यांनी देसाईंची भेट घेतल्याची टिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली. त्यावर आता अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार म्हणाले की, राजकीय विरोधक म्हणजे कुणी दुष्मन नव्हे. एकमेकांवर राजकीय टीकात्मक बोलले तरी विकास कामाबाबत चर्चा, संवाद होतच असतो. मी मंत्री असताना अनेक राजकीय नेते भेटच होतो. अशा अनौपचारिक बैठकीमध्ये विकास कामाबाबत चर्चाही केली जाते. आमचे पक्ष निराळे आहे. म्हणजे राजकीय दुष्मनी नाही. सत्ताधारी विरोधक म्हणजे आम्ही काही शत्रू नाही, हे समजून घ्यावे असंही अजित पवारांनी निश्कून सांगितले.
“याच संगतीमुळे सरकार गेले, खासदार, आमदार, गेले, पक्षाची शकले उडाली”; भाजपची राऊतांवर टिका
पार्श पवार आणि शुंभुराज देसाई यांच्या भेटीनंतर गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. रोहित पवार हे विधानसभेचे आमदार आहे. ते आता मुंबई क्रिकेट मंडळाचे अध्यक्षही झाले आहे. त्यामुळे पार्थ पवार नाराज असू शकतात. घरातून, आजोबांकडून अन्याय होत असेल म्हणून शंभुराज देसाई यांची भेट घेतली असेल, तसेच पार्श पवार यांना राजकारणात स्थिर व्हायचे असेल असा टोलाही गोपीचंद पडळकर यांनी लगावला.
Read also
- पुण्यात भाजपचं ‘ऑपरेशन कमळ’ फुलणार..! काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीचे 30 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर
- बाळासाहेबाच्या तैलचित्राचं अनावरण विधानसभेत, ठाकरे अन् शिंदे आमनेसामने येणार का ?
- “आमदार थोरात हे भाची समजून आपल्या मागे उभे राहतील”; शुंभागी पाटलांचा विश्वास, काल गेटवरूनच परतल्या
- निवडणुक आयोगासमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद , निर्णय काय?
- बीकेसीवर गरिबांची क्रूर चेष्टा, पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील सभेला गर्दी जमवण्यासाठी स्वनिधी योजनेचा वापर