मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड केल्यानंतर अनेक नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना साथ दिली. यात आंबेडकर चळवळीशी संबंधित असलेल्या वक्त्या सुषमा अंधारे यांनी देखील शिवसेनेत प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांनी उपनेते पद दिलं. त्यानंतर सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेद्वारे बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आहेत.
‘टिकली’ प्रकरणावर भिडेंनी महिला आयोगाकडे मागितला 10 दिवसांचा वेळ
यातच आता शिंदे गटातील आमदार नरेंद्र बोंडेकर यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टिप्पणी केली आहे. ते म्हणाले की, सुषमा अंधारे प्रखर आंबेडकरवादी चळवळीतून आल्या असून, त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची आहे. बाळासाहेबांचे विचार आणि प्रखर हिंदूत्व सुषमा अंधारेंनी स्वीकारलं का ? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सोडले असतील, तर ते बाळासाहेबांचे विचार स्वीकारतील का? असा सवालही त्यांनी केला आहे. तसेच तीन महिन्यात हिंदूत्व समजणे सोप्प नाही. असा शाब्दिक टोलाही त्यांनी हाणला.
“शिंदे सरकारच्या विसर्जनाची घंटा रावसाहेब दानवेंनी वाजवली”
दरम्यान, सुषमा अंधारे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून त्या बंडखोर आमदारांवर सातत्याने निशाणा साधत आहेत. काल त्या रत्नागिरीत असताना त्यांनी राणे कुटुंबियांवर हल्लाबोल केला. यातच सुषमा अंधारे यांच्यामुळे शिवसेनेला करारी तोफ मिळाली असल्याचं म्हटलं जात आहे.
Read also
- महापालिकांच्या निवडणुकांचा बिगूल लवकरच वाजणार…! प्रभाग रचनेचा आयुक्तांना आदेश
- “येणाऱ्या काळात या सरकारला जनता घालवल्याशिवाय राहणार नाही”
- “राहुल गांधींचा महाराष्ट्रातील जनतेसाठी खास संदेश”; म्हणाले, ‘या भूमीत…’
- “हा मला मुख्यमंत्र्यांनी 900 खोके दिलेत”; बंडखोर आमदार प्रताप सरनाईक
- गुजरातच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुट्टी..! सुट्टी का ? सेनेचा सवाल