मुंबई : सध्या युक्रेन रशिया युद्ध सुरु आहे. भारतातील कित्येक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी ऑपरेशन गंगा सुरु केले आहे. ऑपरेशन गंगा अंर्तगत अनेक विद्यार्थ्यांना मायदेशात आण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. यावेळी एका विमानाचे स्वागत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले.
एका व्यक्तीच्या इगोमुळे सर्व जगाला त्रास; रोहित पवारांची रशिया युक्रेन युद्धावर प्रतिक्रिया
यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं होतं की बुखारीया अमुक देशाची राजधानी आहे वगैरे वगैरे आणि ही सर्व चुकीची माहिती होती हे समोर आले. त्यावर काल चहापानाच्या कार्यक्रमात बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. एवढंच नाही तर सध्या केंद्रीय यंत्रणांच्या सुरु असलेल्या छापेमारीला देखील उत्तर दिले आहे. नुसती उचलली जीभ लावली टाळ्याला असं काही करू नका, थोडी माहिती घेऊन बोलत जा आणि जर माहिती नसेल तर बोलतच जाऊ नका असं अजित पवार यांनी राणेंना ठणकावून सांगितलं आहे.
ऑपरेशन गंगा अभियानावर राजकारण करण्याची गरज नाही; शिवसेनेला परराष्ट्र राज्य मंत्र्याचा टोला
काल झालेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपने थेट बहिष्कार टाकला होता. जर दाऊदशी संबंध असणाऱ्या व्यक्तीचा तुम्ही राजीनामा घेत नसाल आणि अशा देशद्रोह्यांना माफ करणार असाल तर चहापानाला येणार नाही देवेंद्र फडणवीस यांनी अधिच स्पष्ट केलं होतं. मागील आठवड्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्याबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना जाब विचारणार असल्याचेही उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यपालांची सहज भेट होत नाही, मात्र कधी तरी चहा घेताना त्यांना जाब नक्की विचारणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
Read also:
- नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याबाबत पालिकेत सुरक्षा व्यवस्था वाढवली; आयुक्तांनी दिले आदेश
- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा राडा; विधानभवनाच्या पायऱ्यावरच जोरदार घोषणाबाजी
- नवाब मलिक यांचे दाऊद कनेक्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चहापानावर बहिष्कार?
- गेल्या ३० वर्षांमध्ये आम्ही सापाला दूध पाजलं, आता तेच आमच्यावर फुत्कारतय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- धनगर समाज, यशवंत ब्रिगेडचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; ‘या’ प्रमुख मागण्यांचा केला पाठपुरावा