पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 मार्चला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. बहुप्रतिक्षित असलेल्या पुणे मेट्रोचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गरवारे कॉलेज येथील पुणे मेट्रो स्टेशनचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यावर कॉंग्रेस आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महापालिकेची सुरक्षा कडक करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
अजित पवारांना कुठलीही किंमत राहिली नाही; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात
भाजप नेते किरीट सोमय्यांना महापालिकेच्या पायऱ्यावर धक्काबुक्की करण्यात आली होती. त्यामुळे पालिका सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी पालिकेत येणार असल्याने त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात येणार आहे. त्यामुळे आता पालिकेत प्रवेशासाठी पास अनिवार्य करण्यात आला आहे.
एका व्यक्तीच्या इगोमुळे सर्व जगाला त्रास; रोहित पवारांची रशिया युक्रेन युद्धावर प्रतिक्रिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यांवरून कॉंग्रेसने भाजपच्या कार्यलयाच्या बाहेर आंदोलने केली होती. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पुण्यात येण्या अगोदरच कॉंग्रेसने गो बँक मोदी ची घोषणा दिली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण आणखीनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पुणे मेट्रोच्या स्टेशनला महान व्यक्तींची नावे देणार असल्याचे बोलण्यात येत आहेत. त्यामुळे गरवारे कॉलेजजवळील मेट्रो स्थानकाचे नामकरण स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्या, अशी मागणी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यांनी या संदर्भात मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांना पत्र देखील पाठवले आहे.
Read also:
- अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांचा राडा; विधानभवनाच्या पायऱ्यावरच जोरदार घोषणाबाजी
- नवाब मलिक यांचे दाऊद कनेक्शन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा चहापानावर बहिष्कार?
- गेल्या ३० वर्षांमध्ये आम्ही सापाला दूध पाजलं, आता तेच आमच्यावर फुत्कारतय – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- धनगर समाज, यशवंत ब्रिगेडचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला; ‘या’ प्रमुख मागण्यांचा केला पाठपुरावा
- ऑपरेशन गंगा अभियानावर राजकारण करण्याची गरज नाही; शिवसेनेला परराष्ट्र राज्य मंत्र्याचा टोला