पुणे: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा कौर यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. चुलीवर भाकरी करताना खासदार कौर या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदविण्यासाठी तर त्यांनी हा व्हिडिओ बनवला नाही ना, असा प्रश्न नेटीझन्स विचारत आहेत.
हे पण वाचा: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा
सध्या, संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू असून त्या दिल्लीतही आवाज उठवत आहेत. दरम्यान, या व्हिडिओवरुन राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी नवनीत कौर यांच्यासह मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.
गॅस महाग झाल्यामुळे खा.
नवनीत राणा यांना गॅस ऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदार पण महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!#गॅस_दरवाढ https://t.co/zA7Ci6eI6G— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) August 2, 2021
हे पण वाचा: अनिल देशमुख प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात, ठाकरे सरकारची सुप्रीम कोर्टात धाव
शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गेल्या काही दिवसांपासून टीकास्त्र सोडणाऱ्या खासदार नवनीत राणा यांना चुलीवर भाकरी करताना पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. कारण, भाजपाच्या समर्थनार्थ भूमिका घेणाऱ्या राणा यांनी चुलीवर स्वयंपाक का केला, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
हे पण वाचा: औरंगाबाद पंचायत समितीत राडा; भाजपच्या उपसभापतीला दालनात घुसून मारहाण
नेटीझन्सने याचा संदर्भात इंधन दरवाढीविरोधात जोडला आहे. मात्र, याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलं नाही. पण, सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर, रुपाली चाकणकर यांनीही हा व्हिडिओ शेअर करत महागाईमुळेच नवनीत कौर चुलीवर स्वयंपाक करत असल्याचं म्हटलंय. गॅस महाग झाल्यामुळे खा. नवनीत राणा यांना गॅसऐवजी चुलीवर स्वयंपाक करावा लागत आहे. मोदीजी तुमच्या राज्यात खासदारदेखील महागाईमुळे गॅस ऐवजी चूल वापरायला लागले आहेत. व्वा! मोदीजी व्वा!