जळगाव : महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा पक्षाला रामराम ठोकण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाल्याचे दिसत आहे. खडसे आणि त्यांच्या समर्थकाची ऑडिओ क्लीप व्हायरल झाली आहे. यामध्ये एकनाथ खडसेंचा पक्ष सोडण्याचा निर्णय झाल्याचे दिसते. तर पदाबाबत बोलणी सुरु असल्याचं समजतं.
एकनाथ खडसे हे अनेक दिवसांपासून पक्षावर नाराज आहेत त्यामुळे ते लवकरच पक्ष सोडणार आहेत. अशात त्यांना कार्यकर्त्याचा आलेला फोन आणि त्याचा ऑडिओ व्हायरल होताना पहायला मिळत आहे. ज्यामध्ये कार्यकर्ता खडसेंना म्हणतो भाऊ लवकर निर्णय घ्या .. त्यावर खडसे म्हणतात हो ठरलं समजा दुसऱ्या पक्षात जायचं पण तिथं गेल्यावर एखादे पद तर भेटायला पाहिजे ना.त्यावर कार्यकर्ता पुन्हा म्हणतो पंकजा मुंडे आणि बाकीच्यांना पक्षाने पुन्हा पद दिले आहे त्यामुळे लवकर ठरवा. खडसे पुन्हा सांगतात जायचं तर ठरलं आहे लवकरच निर्णय घेऊ.
पंकजा मुंडे आणि विनोद तावडे या दोन माजी मंत्र्यांचे पुनर्वसन करण्यात आले त्यांना भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागणारे माजी मंत्री एकनाथ खडसे पुन्हा एकदा पुनर्वसनापासून वंचित राहिले होते त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत त्यांचे हे बोलणे व्हायरल झाले होते.
एकनाथ खडसे यांचा ऑडिओ