मुंबई : महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यातीलच एक म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे आहेत. ईडीकडून खडसेंना वारंवार समन्स बजावण्यात आले आहे. त्यानंतर ते आज चौकशीला सामोरे जाण्याची शक्यता आहे.
खडसेंना गेल्या महिन्यात 30 डिसेंबरला ‘ईडी’कडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. कोरोना झाल्याने वैद्यकीय सल्ल्यानुसार खडसे यांनी उपचार व विश्रांती घेतली. विलगीकरणाचा कालावधी आता संपल्याने खडसे शुक्रवारी ईडीच्या कार्यालयात उपस्थित राहून चौकशीला सामोरे जाणार आहेत.
पुण्यातील भोसरी येथील ‘एमआयडीसी’च्या जमीन खरेदी प्रकरणासह अन्य प्रकरणांमध्ये खडसे यांची चौकशी होणार आहे. या प्रकरणामुळे एकनाथ खडसे यांना 2016 मध्ये आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करुन ऑक्टोबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील खडसेंच्या काही सर्मथकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्ष सोडताना त्यांनी ईडी लावली तर मी सीडी लावेन, असे केलेल्या त्यांचे वक्तव्य चर्चेत राहिले होते.
Read Also :