नवीदिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे वारंवार देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत होते आणि माझी अशी काय चूक झाली असा सवाल पक्षश्रेष्ठींना विचारत होते. मात्र आता खडसे यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिले आहे.
एकनाथ खडसेंना मनीष भंगाळे प्रकरणात नव्हे तर MIDC जमीन खरेदीप्रकरणात राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यावर गुन्हा माझ्यामुळे नाही तर उच्च न्यायालयाच्या आदेशान दाखल झाला, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ खडसेंवर पलटवार केला आहे.
देवेंद्र फडणवीस आज दिल्लीत आहेत. त्यांनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधताना एकनाथ खडसे, मराठा आरक्षण, कंगना रनौत अशा विविध विषयावर भाष्य केलं.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे नेमकं ?
“माझ्याविरुद्ध जे षडयंत्र रचले, ते देवेंद्र फडणवीस यांनी, मला देवेंद्रजींच्या माध्यमातून त्रास झाला, हे नाव घेऊन सांगतो” असा गंभीर आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला होता. मी पुरावे जमा केले आहेत, मी वरिष्ठांना जाब विचारणार, असेही खडसे यांनी सांगितले होते.
Read Also
कंगना राणावत भाजपमध्ये जाणार ?https://t.co/k66bGCjp0r@KanganaTeam @BJP4India
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 11, 2020