गोंदिया : राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी असतांना अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या गृहजिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. युवक राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांसह सुमारे ३०९ कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा…शरद पवारांना कोर्टाचा मोठा दिलासा..! शरद पवारांनी कोर्टातला ‘हा’ निकाल जिंकला
राज्यात राष्ट्रवादीतील फुटीनंतर हे सर्व कार्यकर्ते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच होते. मात्र, सद्या राज्यातील वरिष्ठ पातळीवरील भाजप-राष्ट्रवादीच्या मैत्रीमुळे स्थानिक भाजपच्या कार्यकर्त्यांकडून त्रास होत असल्याचा आरोप करत या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसचा हात पकडलाय. भाजपकडून होत असलेला त्रास आणि खासगीकरणाचा सपाटा, यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी काॅंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी आणलेल्या जेसीबीला अपघात, तीन ते चार जण जखमी
दरम्यान, यामुळे गोंदियात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीसह महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल हटवार यांनी १०० कार्यकर्त्यांसह तसेच भाजपच्या सुमारे १०० कार्यकर्त्यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशानंतर देवरी आमगाव विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला बळ मिळाले असून राष्ट्रवादी, भाजप व मनसेला मोठा धक्का बसला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून पवारांवर दुसऱ्यांदा केला गंभीर आरोप,” आयोगात जोरदार खडाजंगी
हेही वाचा…“पक्षावर एकच व्यक्ती वचर्स्व गाजवू शकत नाही”, अजित पवार गटाने आयोगात दिला ‘त्या’ प्रकरणाचा दाखला
हेही वाचा…शरद पवारांची मोठी खेळी, अजित पवारांचा एकेकाळचा कट्टर समर्थक शरद पवार गटात दाखल ?
हेही वाचा…काॅंग्रेसची महत्वाची बैठकीत पुण्यातील आमदारांची दांडी, चर्चांना उधाण
हेही वाचा…शिंदे गटाचा होणार भ्रमनिरास..! अजित पवार गटाला केंद्रात अन् राज्यात लागणार मंत्रीपदाची पुन्हा लॉटरी