IMPIMP

आयकर नोटीस बाबत शरद पवार यांना निवडणूक आयोगाने दिले ‘हे’ स्पष्टीकरण

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना प्राप्तिकर विभागाची नोटीस मिळाली आहे. राजकीय विरोधकांना प्राप्तिकर विभागाच्या माध्यमातून नोटिसा बजावून त्यांच्यावर दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान निवडणूक आयोगाने शरद पवारांचा आरोप फेटाळला असून नोटीस देण्याचा कोणताही आदेश देण्यात आला नव्हता असं सांगितलं आहे.

निवडणूक आयोगाने निवेदन प्रसिद्ध करत सांगितलं आहे की, “भारतीय निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाला शरद पवारांना नोटीस बजावण्यासाठी कोणताही आदेश दिला नव्हता”.

काय म्हणाले होते शरद पवार नेमकं
संपूर्ण देशात आमच्यावर विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे. मला काल नोटीस आली असून काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. निवडणूक आयोगाच्या सांगण्यावरुन मला ही नोटीस आली आहे. त्याचं उत्तर लवकरच मी देईन, कारण उत्तर दिलं नाही तर दिवसाला 10 हजारांचा दंड असल्याचा उल्लेख नोटीसमध्ये आहे. 2009, 2014 आणि 2019 या निवडणुकीत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राबाबत ही नोटीस आहे असे देखील शरद पवार यांनी यायला सांगितले.

Read Also