IMPIMP
RAUT RAUT

सर्वसामान्यांना झटका! वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही – नितीन राऊत

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांना वाढीव वीज बिल आले होते. आधीच कोरोना काळात नोकरी गमवाल्याने, पैसे नसताना वाढीव वीज बिल आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. आता राज्य सरकारने वीज बिल सवलतीबाबत यु-टर्न घेतला असून, वाढीव वीज बिल कमी करणे शक्य नसल्याचे म्हटले आहे.

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत म्हणाले की, राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत. दोनच दिवसांपुर्वी महावितरणने वीज बिल वसुलीचे आदेश काढले होते.

नितीन राऊत म्हणाले की, ऊर्जा विभागातील कंपन्यांवर 69 हजार कोटी रुपयांचा कर्जभार आहे. आम्ही आता कर्ज काढू शकत नाही. ग्राहकांना वीज बिलात दिलासा देता यावा यासाठी राज्य सरकारनं खूप प्रयत्न केला. केंद्र सरकारकडे देखील मदत मागितली. मात्र, दुर्दैवाने केंद्र सरकारकडून काहीही मदत मिळाली नसल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटींनी प्रचंड वीज बिल होते. हा मुद्दा गाजल्यानंतर सरकारकडून सवलत देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दाखवण्यात आला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी . संदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचीही भेट घेतली होती. मात्र आता राज्य सरकारने यु-टर्न घेतला आहे.