सोलापुर : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देत धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांनी राष्ट्रवादी पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. उत्तम जानकर यांनी याआधी देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली होती. मात्र देवेंद्र फडणवीस यांना मनवण्यात त्यांना यश आलं नाही. अखेर जानकरांनी आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केलाय.
उत्तम जानकर यांच्या पक्ष प्रवेशाबाबत जयंत पाटलांनी मोठी प्रतिक्रिया दिलीय. मला उत्तम जानकर यांचे कौतुक करावेसे वाटते की, अनेक प्रलोभने समोर असताना, अनेक आश्वासने समोर असताना त्यांनी माळशिरसच्या जनतेसोबत राहण्याचा व स्वाभिमानाने विधानसभेत पोहोचण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मोहिते पाटील साहेबांना साथ देण्याचा निर्णय घेऊन तालुक्याचा विकास करण्याचा मानस केला आहे. मला खात्री होती जानकर साहेब योग्य भूमिका घेतील.
हेही वाचा…बारामती लोकसभा मतदारसंघात मनसेकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार
महाराष्ट्रातील वातावरण आज बदलले आहे. अकलूज आणि माळशिरसमध्ये जो निर्णय झाला त्याने दाखवून दिले की, महाराष्ट्रात आम्ही स्वाभिमानाने राहतो. दिल्लीसमोर आम्ही झुकत नाही. तुम्ही कितीही विमानं पाठवली तरी आम्ही तुमच्यासोबत जाणार नाही हे जानकर साहेबांनी दाखवून दिले. २०१४ पासून काही जणांनी महाराष्ट्राचे वातावरण खेळवत ठेवले आहे. या १० वर्षात देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची अवस्था या लोकांनी वाईट केली. दबाव टाकायचा आणि पक्षात घ्यायचे असा पायंडा घातला जात होता. असेही जयंत पाटलांनी म्हटलं.
हेही वाचा…तटकरेंच्या प्रचाराचा नारळ फोडला, सुनील तटकरेंच्या प्रचारासाठी अनिकेत तटकरे सक्रीय
देशातील आणि राज्यातील अनेक लोकांनी हे भोगले. पण मोहिते पाटील आणि जानकर साहेबांनी हा पायंडा मोडून काढला. मी दोघांचे अभिनंदन करतो. विविध पक्षामध्ये आपले अनेक उमेदवार अडकले आहेत. पण २०२४ सालच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला अधिकाधिक जागा मिळाव्यात यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करूयात. आपल्या सर्वांची सोबत असताना ते सहज शक्य आहे. असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघात नाराज उत्तम जानकर यांनी अखेर मौन सोडले. भाजपाने आमच्या वर अन्याय केला असून आमच्या तालुक्यात आम्ही राजकारणातून बाहेर कसे राहू हेच काम भाजपाने केले. माढा आणि सोलापूर मधील महाविकास आघाडीचे उमेदवार निवडणून येतील असा विश्वास उत्तम जानकर यांनी व्यक्त केला. गेली अनेक वर्षे जानकर आणि मोहिते पाटील यांच्यातील संघर्ष अखेर संपुष्टात आल्याने माढ्याच्या निवडणुकीत मोहिते पाटील यांचे पारडे जड झाल्याचे सध्याचे चित्र आहे.
READ ALSO :
हेही वाचा…अखेर ठरलं ! मुरलीधर मोहोळांसाठी पुण्यात ‘या’ दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा
हेही वाचा…बीड लोकसभेतून ज्योती मेटे यांची माघार, पत्रकार परिषदेतून केली घोषणा
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना पंतप्रधानपदाची संधी मिळाली तर त्याला शरद पवारांचा पाठिंबा”
हेही वाचा…आढळरावांनी प्रचारात घेतली मोठी आघाडी, हडपसर मतदारसंघात लोकांचा मोठा प्रतिसाद