मुंबई : पुढची १० ते २० वर्षे नरेंद्र मोदींना पर्याय नाही असं वक्तव्य योगगुरु बाबा रामदेव यांनी केलं आहे. मी मोदींचा भक्त नाही पण एक राष्ट्रभक्त नक्कीच आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील राष्ट्रभक्त आहेत.
त्यामुळे पुढची १० ते २० वर्षे त्यांना काहीही पर्याय नाही असं बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी त्रियोग करावा तर काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी मौन योग करावा असा खोचक सल्लाही बाबा रामदेव यांनी दिला आहे.
योगगुरू बाबा रामदेव हे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप पक्षाचे मोठे समर्थक मानले जातात. 2014 साली काळ्या पैशांच्या मुद्द्यांवरुन त्यांनी तात्कालीन संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारला लक्ष्य केले होते. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांना सत्तेत आणण्यासाठी त्यांचा मोठा वाटा आहे.
Read Also :
असदुद्दीन ओवेसी म्हणजे दुसरे जिना, शायर मुनव्वर राणांची बोचरी टीका
मेधा कुलकर्णी भाजप सोडणार का? म्हणाल्या….
….तर राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, मंत्री वडेट्टीवारांचा दानवेंना टोला
नितीश कुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपद पण एनडीएच्या ‘या’ अटी आणि ही ‘नियम’ पाळावी लागणार