पुणे : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी सर्वच पक्षाकडून उमेदवार हे मैदानात उतलले आहे. पुण्यातून भाजपकडून संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे माजी आमदार मेधा कुलकर्णी या नाराज असल्याची चर्चा होती. परंतु, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळीच मला विधान परिषदेची उमेदवारी देणार असा शब्द देण्यात आला होता, असा खुलासा मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे सर्वच पक्षात नाराजीचे सूर उमटले आहे. पुण्यात सुद्धा कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी सांगलीचे संग्राम देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे मेधा कुलकर्णी नाराज असून पक्ष सोडतील अशी चर्चा रंगली होती. परंतु, दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, मेधा कुलकर्णी यांनी हे वृत्त फेटाळून लावले आहे.
‘आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी विधान परिषदेची उमेदवारी देणार असा शब्द देण्यात आला होता. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांसठी कोथरूडची जागा सोडली होती, मुळात तो पक्षाचा आदेश होता, तो मानला होता. पक्षासोबत माझी निष्ठा कायम आहे. कोथरूड हे माझं माहेर घर आहे, त्यामुळे याच मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवणे यापेक्षा दुसरा आनंद नाही. यंदा तर संधी हुकली पण पुढच्या निवडणुकीत कोथरूडमधूनच विधानसभा लढवणार’, अशी इच्छा मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.
तसंच, मी पक्षावर नाराज नाही. माझ्याबद्दल अनेक जण मुद्दाम बातम्या पसरवत असतात. मला इतर पक्षाकडून सुद्धा तिकीटं देण्याचे प्रयत्न केले जात आहे. पण, मी पक्ष सोडणार नाही. त्यामुळे असा खोडसाळपणा जर कुणी करत असेल तर त्यांनी तो थांबवला पाहिजे, मी कोणत्याही पक्षाच्या संपर्कात नाही, भाजपने जो पदवीधरसाठी उमेदवार दिला आहे, त्याचे प्रामाणिकपणे काम करणार आहे, असंही मेधा कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.
Read Also :
….तर राज्यात अक्षता पडायच्या आधीच नवरी पळाली, मंत्री वडेट्टीवारांचा दानवेंना टोला
नितीश कुमार यांना मिळणार मुख्यमंत्रीपद पण एनडीएच्या ‘या’ अटी आणि ही ‘नियम’ पाळावी लागणार
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा स्वभाव लय भारी’, मंत्री अशोक चव्हाणांनी उधळली स्तुतीसुमने
देशातील डिजीटल माध्यमांवर केंद्र शासनाने लावला अंकुश, गृहमंत्री अनिल देशमुखांकडून केले स्वागत
ईडी काय तुमच्या बापाची आहे का? असेल तरी तुम्हाला आम्ही 25 वर्ष घरी बसवणार : शिवसेना नेते संजय राऊत