मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीरपणे स्तुतीसुमने उधळली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा स्वभाव खूप सकारात्मक आहे, अशा शब्दात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची तोंडभरुन स्तुती केलं आहे. शिवसेना खासदार हेमंत पाटील यांच्यासमोर अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली.
राज्यात तीन पक्षाचे सरकार अस्तित्वात आल्याने राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आहे. विशेषतः कालचे कट्टर प्रतिस्पर्धी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आले आहेत. त्यातून अनेकदा जाहीर कार्यक्रमांतून जुन्या कटू आठवणींना आता उजाळा मिळतोय. दिवाळीच्या पूर्वसंध्येला नांदेडमध्ये दैनिक सत्यप्रभा या दैनिकाच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन रात्री पार पडले. यावेळी अशोक चव्हाण तसंच खासदार हेमंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.
“स्वप्नात देखील काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येईल, असं कुणाला वाटलं नव्हतं. आम्ही तर कधी असा विचार देखील केला नव्हता. मात्र वर्षाभरापूर्वी पवारसाहेब, सोनियाजी आणि उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र हिताचा निर्णय घेतला आणि त्या निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. राज्याला विकासकामांच्या बाबतीत सकारात्मक मुख्यमंत्री लाभला आहे. उद्धव ठाकरेंचा स्वभाव खूप सकारात्मक आहे”, असं चव्हाण म्हणाले.
Read Also :
ईडी काय तुमच्या बापाची आहे का? असेल तरी तुम्हाला आम्ही 25 वर्ष घरी बसवणार : शिवसेना नेते संजय राऊत
अर्णब गोस्वामीचा थेट भाजपशी संबंध, म्हणून देवेंद्र फडणवीसांनी प्रकरण दाबले…
किरीट सोमय्या यांनी केली मुंबईच्या महापौर आणि ठाकरे सरकार विरोधात जनहित याचिका याचिका
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले ‘शिखंडी’ : महापौर किशोरी पेडणेकर
आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; नीलम गोऱ्हेंचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार
“आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर “राऊतांनी सोमय्यांना सुनावले