मुंबई : किरीट सोमय्या यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए योजनेत फ्लॅट आणि ऑफिस लाटल्याचा आरोप करत त्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात बोलताना महापौर यांनी किरीट सोमय्या म्हणजे महाभारतातले ‘शिखंडी’, असं म्हणत त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, “आपण थोडं मागे गेलो तर महाभारतात किंवा रामायणात असे काही चांगल्या भूमिका होत्या शिखंडीसारख्या. त्यामुळे अशा लोकांना किती मनावर घ्यावं? किंवा त्यांच्याकडे किती लक्षं द्यावं हा प्रश्नच आहे. किरीट सोमय्यांनी आरोप केला म्हणजे, मी आरोपी होत नाही. कारण आरोप करणं सोपं आहे, पण ते सिद्ध करावेत. कारण सोमय्या यांना फक्त त्याच कामांसाठी नेमलं आहे.
बऱ्याचदा फ्रॉड हा शब्द उच्चारला नाही, केवळ किरीट सोमय्या म्हटलं तरी फ्रॉड असं म्हणायचं आहे हे कळंत.’ पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, ‘कोणतीही जनहित याचिका करू देत. आम्ही सगळ्याला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत.
Read Also :
आपल्या नावातील ‘अ’ मृतावस्थेत जाऊ देऊ नका; नीलम गोऱ्हेंचं अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर
मुंबईत अधिवेशनाने कोरोना होणार नाही का?; सुधीर मुनगंटीवार
“आम्ही म्हणतोय आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर “राऊतांनी सोमय्यांना सुनावले
“थातूरमातूर बोलून विषय टोलवू नका; सोमय्यांच्या आरोपांना उत्तरं द्या “