गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री, भाजपचे ज्येष्ठ नेते केशुभाई पटेल यांचे अहमदाबादेत वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मागील काही काळापासून ते आजारी होते. आता गुजरात भाजपमध्ये भाजपने एक मोठा नेता गमावला आहे, कारण त्यांच्या मागे पाटीदार समुदायाचा मोठा जनाधार होता. मोठा काळ ते गुजरातच्या राजकारणात सक्रिय होते. २००१ साली तत्कालीन भाजप नेते नरेंद्र मोदींसमवेत मतभेद झाल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं होत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांना आपला राजकीय गुरु मानायचे.
त्यांना श्वसनाचा त्रास जाणवायला लागल्यावर अहमदाबादेत एका रुग्णालयात भरती करण्यात आलं होत. पण उपचारास यश न आल्याने त्यांचं निधन झालं आहे. ते त्यांच्या राजकीय जीवनात दोनदा गुजरातचे मुख्यमंत्री झाले पण दोन्ही वेळा त्यांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आला नाही, १९६० च्या दशकात केशु भाई पटेलांनी जनसंघातून आपल्या राजकीय जीवनाला सुरुवात केली होती. ते जनसंघाच्या संस्थापक सदस्यांमध्ये शामिल होते.
नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाल्यावर त्यांना मार्गदर्शक मंडळात स्थान देण्यात आलं होत. आता भाजप च्या या मोठ्या नेत्याच्या जाण्याने भाजपने एक मोठा जनाधार असलेला नेता गमावल्याची भावना भाजप नेते व्यक्त करत आहेत.
Read Also :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राडा, कुलगुरूंना ABVP च्या विद्यार्थ्यांनी घातला घेरावhttps://t.co/WGLovUPSqJ#ABVPPUNE #ABVP #SFPU @ABVPVoice @ABVPMumbai @ABVPPune
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 29, 2020