मुंबई: महाड पोलादपूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांचे रात्री उशिरा मुंबईत निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे. ते ५४ वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील ग्लोबल रुग्णालयात उपचार सुरू होते. आज दुपारी २ वाजता त्यांची अंत्ययात्रा महाड येथील त्यांच्या निवास स्थानावरून निघणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हे पण वाचा: भास्कर जाधवांना एवढा कशाचा माज? मुख्यमंत्र्यांसमोर महिलांबरोबर गैरवर्तणूक आणि अरेरावी
माणिकराव जगताप हे काँग्रेसचे विद्यमान रायगड जिल्हा अध्यक्ष होते. महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी याआधी आमदारकी भूषवली होती. २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ते महाड विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती.
हे पण वाचा: हर्षवर्धन पाटलांचा कुणी केला ‘करेक्ट कार्यक्रम’? भरणेंचा मोठा गौप्यस्फोट
कोण होते माणिकराव जगताप?
काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अशी काँग्रेसमध्ये त्यांनी मोठी पदे भुषवली आहेत, महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार, महाड नगरपालिकेवर १५ ते २० वर्ष वर्चस्व होते. रायगड जिल्ह्यामध्ये सुनिल तटकरे यांच्या वर्चस्वाला थेट आव्हान करणारे एकमेव राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळख जात असत, दक्षिण रायगडमध्ये प्रचंड जनमत असलेले कोकणातील काँग्रेसचे मोठे नेते, माणिकरावांची कन्या स्नेहल जगताप या महाडच्या नगराध्यक्षा आहेत.