नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं आज पहाटे निधन झालं आहे. मागील काही दिवसापासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचं पहाटेच्या वेळी त्यांचं निधन झालं आहे. आईच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी गांधीनगरमध्ये दाखल झाले असून पार्थिवाला यु.एन. मेहता रूग्णालयातू मोदींच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं. त्यानंतर गांधी नगरमधील येथील स्मशानभूमीत त्यांचं अंत्यसंस्कार करण्यात आलं.
“अब्दुल सत्तारांच्या 50 पेक्षा घोटाळ्याची प्रकरणं बाहेर येणार”
नरेंद्र मोदी यांच्या आईचं निधन झाल्यानंतर देशभरातून त्यांना भावपुर्ण श्रंद्धाजंली वाहण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन यांचे निधन झाल्याची बातमी ऐकून अतीव दु:ख झालं आहे. आम्ही सर्व नरेंद्र मोदी यांच्या दु:खात सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या मातोश्रींच्या आत्म्यास सद्गती प्रदान करो हीच प्रार्थना आहे. असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
“एकनाथ शिंदे गट महाराष्ट्रात गुंडराज आणू पाहत आहे का ?” राष्ट्रवादीचा सवाल
हिराबेन मोदी यांचं निधनावरून संजय राऊतांनी देखील दु:ख व्यक्त केलं आहे. हिराबेन मोदी यांंचं निधन झालं असून शिवसेना, ठाकरे कुटुंब, देशवासी सर्वजण त्यांच्या कुटूंबीयांच्या दु:खात सहभागी आहेत. या संकटसमयी आम्ही त्यांच्यासह आहोत. नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचं जीवन संघर्षमय होतं. त्यांनी अशा मुलाला जन्म दिला ज्याने आपल्या पक्षासाठी नेहमी संघर्ष केला, कष्ट केले. तेच नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले. अशा मुलाला जन्म देऊन हिराबेन मोदी यांनी समाज आणि देशासाठी मोठं योगदान दिलं अशा भावना संजय राऊतांनी व्यक्त केल्या.
Read also
- “शिंदे अन् फडणवीस साहेबांची जोडी ही राम लक्ष्मणाची जोडी”
- नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचं निधन, देशभरातून भावपुर्ण श्रंद्धाजली
- भारतातील पहिल्या संविधान भवनच्या कामाला गती द्या : आमदार महेश लांडगे
- “..तर तुम्ही मला लग्न करण्यापासून थांबवलं असतं”, फडणवीसांनी सांगितला तो लग्नाचा किस्सा
- “उद्या एकनाथ शिंदे सभागृहात खाकी पॅट घालून आले, तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू”; संजय राऊत