कोल्हापूर – बहुप्रतीक्षित गोकुळ दूधसंघ निवडणुकीची मतमोजणी होत असून, निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. पश्चिम महाराष्ट्राचं सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळ दूध संघावर कुणाची सत्ता? हे आज स्पष्ट होत आहे. गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतकं झालं आहे. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे कल आता यायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत पालक मंत्री सतेज पाटील यांच्या ३ शिलेदारांनी बाजी मारली आहे. सतेज पाटील यांच्या विरोधी आघाडीचे उमेदवार आणि माजी आमदार सुजित मिणचेकर हे 346 मतांनी विजयी झाले. तर भटके-विमुक्त प्रवर्गातून बयाजी शेळके यांनी 346 मतांनी विजय मिळवला. , तर अमर पाटील 436 मतांनी विजयी झाले आहेत. तर महिला गटातून अंजना रेडेकर यांचा विजय झाला आहे.
सतेज पाटील गटाच्या या विजयामुळे सत्ताधारी महाडिक गटाची धाकधूक वाढली होती. मात्र महाडिक गटात ४ जागांच्या पराभवानंतर महाडिक गटाच्या माजी जिल्हापरिषद अध्यक्ष शौमिका महाडिक या अल्प मताने निवडून आलेल्या आहे. ४६ मतांनी शौमिका महाडिक यांचा विजय झाला आहे.
दरम्यान, गोकुळ दूधसंघातील 21 जागांसाठी 45 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सत्ताधारी आमदार पी एन पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या राजर्षी शाहू आघाडीला पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक यांच्या राजर्षी शाहू परिवर्तन आघाडीने आव्हान दिलं आहे.