राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीनंतर राजकीय वर्तुळातून त्यावर प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या या मॅरेथॉन मुलाखतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला अनेक राजकीय टोले लगावत हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हानही दिलं. उद्धव ठाकरे यांनी केलेली ही टोलेबाजी भाजप नेत्यांच्या जिव्हारी लागली आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या आव्हानावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे याना प्रत्युत्तर देत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. “मातोश्रीच्या बाहेर पडून आणि मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर बसून आधी सरकार तर चालवून दाखवा !” अशा शब्दात गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत त्यांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.
दरम्यान, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवर यांनी त्याला ‘हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा’ हा फिल्मी डायलॉग असल्याचं प्रत्त्युत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.