No Result
View All Result
सांगली: सांगली जिल्ह्यात काल चांगलाच राडा झालेला पाहायला मिळाला आहे. जिल्ह्यातील आटपाडी येथे असलेल्या साठे चौकात भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली आणि त्यांची गाडी देखील फोडण्यात आली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना गट आणि पडळकर गटात वाद झाला.
या वादाचे रूपांतर पुढे हाणामारीत झालं. या प्रकरणात एका कार्यकर्त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतल्याने परिस्थिती आटोक्यात आली आणि पोलीस बंदोबस्त वाढविण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी बोलताना गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.
राष्ट्रवादी-शिवसेनेचा गट आणि आमदार गोपीचंद पडळकर गटातील वादाचे मूळ कारण सांगली येथे होत असलेल्या मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकांमुळे येथील वातावरण चिघळले आहे.
मध्यवर्ती बँकेची निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक पक्ष डावपेच आखत असून आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले आहेत. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला आहे. त्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आणि पडळकर यांच्या ताफ्यातलय काही गाड्यादेखील फोडण्यात आल्या आहेत.
आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.सदरील घटनेशी माझा काहीही संबंध नव्हता. शरद पवार आणि पालकमंत्री जयंत पाटील यांनीच मला संपविण्याचा कट रचलेला आहे.
मी दिघंचीला चाललो होतो, माझ्यावर अचानक दगड काठ्यांनी भ्याड हल्ला करण्यात आला. हिंमत असेल तर सांगून प्रयत्न करावा, मी सुखरुप आहे, असे गोपचंद पडळकर यांनी म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी तणावाचे वातावरण असून वाद वाढण्याची शक्यता लक्षात घेता आपली कुमक वाढवली आहे.
No Result
View All Result