पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात असलेल्या स्थानिकांच्या घरावर महापालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या कारवाईत ५ घरं पाडण्यात आली. न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पाडापाडी थांबण्यात आली. मात्र, पाडण्यात आलेल्या घरांवरून स्थानिक आक्रमक झाले आहेत. या कारवाईचे पडसाद आज उमटले, ते पुणे महापालिकेच्या समोर. नागरिकांनी ठिय्या मांडत इथे आंदोलन सुरू केलं, मोठ्या संख्येनं लोक जमा झाले होते.
आंबिल ओढा कारवाईनंतर अजित पवारांची पुण्यातील आढावा बैठकीला दांडी
दरम्यान, यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेतली. महापालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईबद्दल सुळे यांनी माहिती घेतली. यावेळी आंदोलकांनी कारवाई का करण्यात आली, पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली. त्याचबरोबर घरं पाडल्याबद्दल अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी घोषणाबाजी केली. आमची घरं अजित पवारांनी पाडली तुम्ही इथे का आलात असा सवालही आंदोलकांनी विचारला.
पुण्यातील आंबिल ओढ्याचा वाद पेटला; नागरिकांचा रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
यावेळी ‘अजित पवारांचा विरोधात पुरावे द्या खरं असेल तर मी स्वतः तक्रार करेन’ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी आंबिल ओढा प्रकरणात आक्रमक पवित्रा घेतला असल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान यावेळी आंदोलकांवर कारवाई का करण्यात आली? असा प्रश्न विचारून आंदोलकांनी, पुन्हा घरं बांधून देण्याची मागणी केली आहे.
आंबिल ओढ्यातील एकालाही बेघर होऊ देणार नाही; महापौर मुरली मोहोळ यांचे स्पष्टीकरण
कात्रज तलावापासून आंबिल ओढ्याला सुरुवात होते. आंबिल ओढा परिसरात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार पुणे महापालिकेकडून ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह बदलण्याचा घाट घालण्यात आल्याचा आरोप होत आहे. ही जागा बिल्डरच्या घशात घातली जाणार आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे. जागा बळकवण्यात लोकप्रतिनिधींचाही हात असल्याचाही आरोप केला जात आहे.
Read Also :
- ओबीसी आहोत म्हणून आपल्याला कमी दर्जाची मंत्रिपदं मिळतात; विजय वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
- मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
- पुणे महापालिकेने दिलेले २०० कोटी गेले कुठे?, ED, CBI चौकशी करा – सुप्रिया सुळे
- शरद पवारांच्या पायाला दुखापत; गाड्या घातल्या थेट ‘रेस ट्रॅक’वर
- अजित पवार मुर्दाबाद..; सुप्रिया सुळेंसमोरच आंबील ओढ्यातील नागरिकांच्या जोरदार घोषणा