पुणे : पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई कऱण्यात आली. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले होते. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली होती.
भाजपच्या नैराश्यापोटी अनिल देशमुखांवर कारवाई, आम्हाला त्याची चिंता नाही – शरद पवार
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळाला. यावेळी काहींनी अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यानच्या काळात आंबिल ओढ्यात ७०० ते ८०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
केंद्र सरकार आपल्या कर्तव्याला चुकलं, जयंत पाटलांचा ओबीसी आरक्षणावरून भाजपवर आरोप
यांनतर, पुण्याच्या राजकीय वर्तुळातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, दर शुक्रवारी पुणे जिल्ह्याच्या महामारी स्थितीच्या आढाव्याची बैठक, कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडत असते. आज शुक्रवार असल्याने, या बैठकीत अजित पवार या मुद्द्यावर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, आज अजित पवार यांनी या बैठीकीला येण्याचे टाळले असून, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली आहे.
भाजपविरोधी आघाडीवर संजय राऊत म्हणतात, “शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज…”
त्यामुळे, त्यांच्या आजच्या गैरहजेरी नंतर राजकीय वर्तुळातून अनेक तर्क वितर्क लावले जात असून, ही कारवाई करणारा इमारत व्यावसायिक आणि अजित पवार यांचे संबंध असल्याच्या देखील चर्चा आहेत. त्यामुळे, ही अनावश्यक चर्चा टाळण्यासाठी त्यांनी या बैठक हजेरी लावली नसल्याचे बोलले जात आहे. तसेच, नुकत्याच झालेल्या भाजपच्या प्रदेश कार्यकारिणच्या बैठकीत, अजित पवारांच्या सीबीआय चौकशीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. यामुळे त्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने देखील, त्यांची आजची गैरहजेरी चर्चेचा मुद्दा ठरली आहे.
Read Also :
- मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी
- अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरात जोरदार निदर्शने, धरपकड सुरु
- मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं; महापौरांच सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर
- ओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार असणाऱ्या मोदी सरकार विरोधात २६ जूनला काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन