मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील, जीपीओ चौकातील निवासस्थानी, तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे, सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे टाकले असून, त्यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून, देशमुखांच्या चौकशी सुरू झाली आहे. त्याच अनुषंगाने हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
दुसरीकडे, ईडीच्या दुसऱ्य़ा पथकाने वरळीच्या सुखदा इमारतीतील घरावरही छापा टाकला आला असून, आता त्याही घराची झाडाझडती सुरु असल्याचे कळत आहे. या दोन्ही ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत. या सर्व चौकशी दरम्यान, काही काळासाठी अनिल देशमुख हे नॉट रिचेबल होते, मात्र काही कालावधीनंतर त्यांची गाडी मुंबईच्या ‘सुखदा सोसायटी’ मध्ये दाखल झाली, त्यापाठोपाठ अजून एक गाडी आत गेली. तेव्हपासून आत्तापर्यंत, जवजवळ ४ तास झाले, देशमुख आणि देशमुख कुटुंबीयांची ईडीकडून कसून चौकशी सुरु आहे.
ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरात जोरदार निदर्शने, धरपकड सुरु
यातच आता, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजिव पालांडे यांना ईडीने ताब्यात घेतलं आहे. त्यांना ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी घेऊन जाण्यात आलं असून, नागपूरमध्ये देशमुख यांच्या कुटुंबियांचे फोन रेकॉर्डिंग तपासले जात आहेत. तसेच, ईडीने काही लोकांचे जबाब नोंदवले आहेत. त्यात डीसीपी राजीव भुजबळ आणि सुमारे 10 ते 12 बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला आहे. त्यात बार मालकांनी काही महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली दिली आहे आणि त्यामुळे ईडीची चौकशी अधिक वेळ घेत असल्याची माहिती, सूत्रांकडून मिळत आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरानंतर, आता ईडीचे मुंबईतील घरावरही छापे
अनिल देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिली होती. तसंच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया, नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे महिन्याच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.
Read Also :
- राष्ट्रवादी उभी राहणार देशमुखांच्या पाठीशी? छाप्यानंतर प्रथमच नेत्यांनी जाहीर केली भूमिका
- झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या
- सीबीआय, ED काय भाजपाची कार्यकर्ती आहे का? – संजय राऊत
- “मुख्यमंत्र्यांसोबत अनिल परब, मिलिंद नार्वेकर, रवींद्र वायकर यांनी बांधलेल्या अनधिकृत बंगल्यांची सीबीआय चौकशी व्हावी”
- मला सल्ला देण्याऐवजी स्वत: आत्मपरीक्षण करावं; महापौरांच सुप्रिया सुळेंना प्रत्युत्तर