नागपूर : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील,जीपीओ चौकातील निवासस्थानी, तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे, सक्तवसुली संचालनालयानं (ईडी) छापे टाकले असून, त्यांच्या घराची झाडाझडती सुरू आहे. सकाळी ८ वाजताच ईडीचे अधिकारी त्यांच्या घरी दाखल झाले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानुसार ईडीकडून, देशमुखांच्या चौकशी सुरू झाली आहे. त्याच अनुषंगाने हा छापा टाकण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.
अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरानंतर, आता ईडीचे मुंबईतील घरावरही छापे
अनिल देशमुख यांनी महिना १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्याची सूचना निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेंसह अन्य अधिकाऱ्यांना दिली होती. तसंच पोलीस अधिकाऱ्यांची बदली प्रक्रिया, नियमित कामकाजातही देशमुख यांचा हस्तक्षेप वाढला होता, असे आरोप करणारे पत्र मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मे महिन्याच्या सुरुवातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले होते.
राष्ट्रवादी उभी राहणार देशमुखांच्या पाठीशी? छाप्यानंतर प्रथमच नेत्यांनी जाहीर केली भूमिका
त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता, ११ मेला ईडीदेखील मनी लॉण्ड्रिंग प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात ईसीआयर दाखल करत, गुन्हा दाखल केला होता. यांनतर, सीबीआयने २१ एप्रिल रोजी अनिल देशमुखांच्या घर आणि कार्यालयासह १० ठिकाणी छापे मारले होते. यात देशमुखांच्या मुंबईतील ‘ज्ञानेश्वरी’ बंगल्याचाही सामावेश होता.
Another team of Enforcement Directorate (ED) raids former Maharashtra Home Minister Anil Deshmukh's residence in Mumbai's Worli area: ED#Maharashtra
— ANI (@ANI) June 25, 2021
यांनतर आता ईडीने सकाळी देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली असून, ५ अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु आहे. दरम्यान, ईडीकडून नागपूरमधील निवासस्थानी छापा टाकण्यात आलेला असताना, ईडीच्या दुसऱ्य़ा पथकाने वरळीच्या सुखदा इमारतीतील घरावरही छापा टाकला आला असून, आता त्याही घराची झाडाझडती सुरु असल्याचे कळत आहे. या दोन्ही ठिकाणी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात आहेत.
अनिल देशमुखांची रवानगी जेल मध्ये होणार; किरीट सोमया यांचे ट्विट
दरम्यान, देशमुखांच्या घरावरील छापेमारीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत असून, नागपूरमध्ये देशमुखांच्या समर्थकांनी त्यांच्या घराबाहेर, ईडी आणि भाजपाविरोधात निदर्शनं केली आहेत. कार्यकर्त्यांनी थेट रस्त्यावरुन ठिय्या आंदोलन देण्याचा प्रयत्न केला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. यावेळी नागपूर पोलिसांनी निदर्शनकारींना अटक केली असून, त्यांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.
Read Also :
- ओबीसी आरक्षण रद्द होण्याला जबाबदार असणाऱ्या मोदी सरकार विरोधात २६ जूनला काँग्रेसचे राज्यव्यापी आंदोलन
- “जनतेवर अन्याय करून, कोणताही विकास करता येणार नाही”- प्रविण दरेकर
- “मुख्यमंत्र्यांसोबत अनिल परब, मिलिंद नार्वेकर, रवींद्र वायकर यांनी बांधलेल्या अनधिकृत बंगल्यांची सीबीआय चौकशी व्हावी”
- सीबीआय, ED काय भाजपाची कार्यकर्ती आहे का? – संजय राऊत
- झेपत नसेल तर राजीनामा द्या; पुण्याच्या महापौरांवर सुप्रिया सुळे कडाडल्या