मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील निवासस्थानी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) छापा टाकण्यात आला आहे. गेल्या तीन तासांपासून ईडीचे अधिकारी देशमुखांच्या निवासस्थानी चौकशी करत आहेत. ईडीच्या छापेमारीनंतर राजकीय क्षेत्रातून विविध प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ईडीच्या या छाप्यावरुन भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे.
अनिल देशमुखांच्यावरच्या ‘ईडी’ने केलेल्या कारवाईवर, फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“सीबीआय, ईडी काय तुमची कार्यकर्ती आहे का?”, असा सवाल संजय राऊत यांनी भाजपला केला आहे. तसेच, “अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरी ईडीने छापेमारी केली. मला वाटतं हे सगळं सत्ताप्रेरित आहे. ईडी आणि सीबीआयची बदनामी होतेय, हे संबंधितांनी लक्षात घ्यावं. प्रताप सरनाईक यांच्याबाबतीतही तेच झालं. अशा गोष्टींमुळे विनाकारण त्रास होतो,” असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
मोठी बातमी! अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात, ४ तासांपासून सुरु आहे चौकशी
यावेळी, शरद पवारांकडून भाजपविरोधी आघाडी उघडण्याच्या तयारी बळ मिळत आहे. यावर, प्रतिक्रिया देताना, “शरद पवारांचं महत्व वाढवण्याची काय गरज आहे, त्यांचा सल्ला तर स्वतः देशाचे पंतप्रधान आणि भाजपचे देशातील प्रमुख नेते घेतात. त्यामुळे, भाजपने विनाकारण आरोप करु नये,” असं भाष्य त्यांनी केलं आहे.
Read Also :
- ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नागपुरात जोरदार निदर्शने, धरपकड सुरु
- सीबीआय, ED काय भाजपाची कार्यकर्ती आहे का? – संजय राऊत
- अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरानंतर, आता ईडीचे मुंबईतील घरावरही छापे
- राष्ट्रवादी उभी राहणार देशमुखांच्या पाठीशी? छाप्यानंतर प्रथमच नेत्यांनी जाहीर केली भूमिका
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी