पुणे : मागील काही दिवसात देशभरातील अनेक नेत्यांच्या सीबीआय आणि इडी मार्फत चौकशी करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या निधीची सीबीआय आणि इडीमार्फत चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल अटळ, पंतप्रधान, नड्डा, शहा यांची बैठक
पुणे शहरातील रामटेकडी येथील कचरा प्रकल्पाची खासदार सुप्रिया सुळे यांनी पाहणी केली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पुणे महानगर पालिकेच्यामाध्यमातून कचरा प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपये देण्यात आले आहे. पुणे शहरातील कचरा उरुळी देवाची आणि रामटेकडी येथील कचरा डेपो कित्येक वर्षापासून येत आहे. इथे येणार्या कचऱ्यावर प्रक्रिया होणे गरजेचे असते. मात्र सध्या कचरा डेपोतील परिस्थिती लक्षात घेता, कोणत्याही प्रकारची प्रक्रिया करण्यात आल्याचे दिसत नाही. यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आजवर वेळोवेळी कचरा प्रकल्पाच्या प्रक्रियेसाठी जवळपास २०० कोटी रुपयांचा निधी दिला गेला आहे. मात्र, हा निधी गेला कुठं, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
आंदोलन ओबीसी आरक्षणासाठी की, सत्तेच्या हव्यासापोटी; रोहित पवारांची भाजपावर टीका
त्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या कचरा प्रकल्पाच्या निधीची सीबीआय आणि इडी मार्फत चौकशी झाली पाहिजे, देण्यात आलेला निधी अखेर गेला कुठे?, याची चाचपणी होणे गरजेचे आहे, त्यामुळे, चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
Read Also :
- मी फडणवीसांना सन्यास घेवू देणार नाही, कारण…- संजय राऊत
- आंदोलन ओबीसी आरक्षणासाठी की, सत्तेच्या हव्यासापोटी; रोहित पवारांची भाजपावर टीका
- गृहमंत्र्यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टिंसिंगचा फज्जा, राजकारण्यांसाठी नवीन नियमावली काढण्याची गरज?
- “हे ३ पक्षांचं सरकार ५ वर्ष टिकेल, शंका नसावी”- शरद पवार
- अनिल देशमुखांसह एका निकटवर्तीच्या अडचणी वाढणार? वसूल केलेले ३ कोटी देशमुखांनी…ईडीचा कोर्टात धक्कादायक दावा