मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपांनंतर, आता अनिल देशमुख पाय या प्रकरणात आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. कालच त्यांच्या स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि पीए कुंदन शिंदे यांना अटक केल्यांनतर, त्यांना ईडीने कोर्टात हजार केले.
न्यायालयात ईडीकडून केले गेले मोठे खुलासे, देशमुखांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता!
त्यानंतर, या संपूर्ण प्रकरणात सचिन वाझे आणि इतर काही बार मालकांनी खळबळजनक आणि धक्कादायक जबाब दिले असून, त्यात बार मालकांनी ३ महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली ईडीला दिली. दुसरीकडे, सचिन वाझेने देखील त्याच्या जबाबात याचा उल्लेख केला आहे.
सचिन वाझेनं ईडीला दिलेल्या जबाबात केला, अनिल देशमुखांबाबत मोठा खुलासा
यांनतर आज ईडीच्या वकिलांनी या संदर्भांत उच्च न्यायालयात आणखीन काही धक्कादायक माहिती दिली असून, यामुळे आता अनिल देशमुखांसह त्यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख हा देखील अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. ईडीने सांगितले आहे की, “वाझेने देशमुखांच्या सांगण्यावरुन डिसें. २०२०-फेब्रु. २०२१ यादरम्यान मुंबईच्या काही पब्स, बारच्या मालकांकडून ४ कोटींहून अधिक वसुली केली असून, हे पैसे वाझेने देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे यांना हे दिले आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स; अकरा वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश
याबाबत अधिक खुलासा ईडीने केला असून, एकूण ४ कोटी ७० लाख रुपयांमधले ३ कोटी १८ लाख रु. देशमुख यांनी, दिल्लीतल्या ४ शेल कंपन्यांच्या माध्यमातून, त्यांचा मुलगा ऋषिकेशच्या नागपूरच्या, श्री साई शिक्षण संस्था चॅरिटेबल ट्रस्टकडे वळवले आहेत.
मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीकडून अटक
तसेच, ही रक्कम संस्थेत देणगी स्वरुपात जमा झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी, त्यांनी आधी ही रक्कम दिल्लीतील २ व्यक्तींना हवालाद्वारे पोच केली, त्यानंतर या २ व्यक्तींच्या नावे नोंद करून, बोगस कंपन्यांच्या खात्यातून ही रक्कम या संस्थेत वळवण्यात आली आहे, असा दावा ईडीने केला आहे. या सगळ्या व्यवहारांत देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे प्रत्यक्ष सहभागी असल्याचेही ईडीने कोर्टाला सांगितले आहे.
Read Also :
- आरबीआयचा निर्णय; आता नगरसेवक, आमदार, खासदार होऊ शकणार नाहीत नागरी बँकांचे संचालक
- “आता अविनाश भोसले-अजित पवारांचे संबंध, काका सामन्यातून जाहीर करतील”- गोपीचंद पडळकर
- “सत्तेत आल्यावर मी आरक्षणाचा प्रश्न सोडवणार, म्हणजेच सत्तेत आल्याशिवाय मी काहीच करणार नाही”
- आंबिल ओढा प्रकरण : महापालिका आयुक्त फडणवीसांच्या भेटीला! महापालिका वर्तुळात चर्चांना उधाण
- आता आमदार-खासदार होऊ शकणार नाहीत नागरी बँकांचे संचालक, आरबीआयचा आदेश; शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया