मुंबई : काल राज्याच्या माजी गृहमंत्री राहिलेल्या अनिल देशमुखांवर ईडीने मोठी कारवाई केली असून, देशमुखांच्या मुंबई आणि नागपूरामधील घरावर काल सकाळपासून, सक्तवसुली संचालनालयाने छापे टाकले. तसेच, घराची झाडाझडती घेतली आणि नातेवाईकांची चौकशी केली आहे.
यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
तसेच, देशमुखांच्या दोन्ही स्वीय सहायकांना ईडीने ताब्यात घेतले आहे, तर या सगळ्या चौकशी दरम्यान, डीसीपी राजीव भुजबळ आणि सुमारे १० ते १२ बार मालकांचा जबाब ईडीने नोंदवला असून, त्यात बार मालकांनी ३ महिने ४ कोटी रुपये हप्ता दिल्याची कबुली ईडीला दिली आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. या जबाबानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांकडून आज दिवसभर विविध ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं बोललं जात होतं.
देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मात्र आंदोलनातला जोर तसूभरही कमी नाही
दरम्यान, ईडीकडून देशमुखांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक करण्यात आली असून, ईडीने शुक्रवारी रात्री उशिरा दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज सकाळी ११ वा. न्यायालयात हजर केले गेले. यातच आता अजून एक मोठी बातमी या प्रकरणाशी संबंधित समोर येत असून, सचिन वाझे आणि बार मालकांच्या जबाबवरुन कुंदन शिंदे आणि संजीव पालांडेला अटक करण्यात आली असल्याचे कळते आहे. ४ कोटी ८० लाख रुपये बार मालकांनी सचिन वाझेला दिले, हेच पैसे वझेने कुंदन शिंदेला दिले आणि कुंदन शिंदेने हे पैसे देशमुखांना दिले, असा खुलासा वाझेनं जबाबात केला आहे, अशी माहिती ईडीच्या सुत्रांनी दिली आहे.
खोटा कळवळा आणून राज्यात चक्का जाम आंदोलन करणाऱ्यांनो, “अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है!”
दुसरीकडे मुंबई सत्र न्यायालयात आज, कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांच्या रिमांड सुनावणीला सुरुवात झाली असून, न्यायमूर्ती डॉ. यू. जे मोरे यांच्या न्यायालयात ही सुनावणी सुरु आहे. वकील शेखर जगताप संजीव पालांडे यांची, तर कुंदन शिंदेंची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर मांडत आहेत. ईडीच्या बाजूने वकील सुनिल गोंसावलीस बाजू मांडत असून, त्यांनी दोघांची ७ दिवसांच्या ईडीच्या कोठडीची मागणी केली आहे.
Read Also :
- “प्रताप सरनाईक यांच्याबाबत लवकरच तुम्हाला बातमी मिळेल”- संजय राऊत
- पिंपरीत पंकजा मुंडे, महेश लांडगे यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
- “संघर्ष कधी करायचा अन् संवाद कधी साधायचं, हे ज्याला कळतं तोच खरा नेता”- मुख्यमंत्री
- परिस्थिती पाहून स्वबळाचा निर्णय घेऊ, नाना पटोलेंचा यु-टर्न
- जो तो आपलं आपलं बघत असतो, ओबीसींचं कोण बघणार? – छगन भूजबळ