मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत असून, राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर, भाजपकडून हे चक्का जाम आंदोलन आज राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीसांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मात्र आंदोलनातला जोर तसूभरही कमी नाही
दरम्यान, यावर आता इतरही पक्षातून प्रतिक्रिया येत असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. “१९९० साली मंडल आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर देशभरात OBC आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला होता आणि योगायोग असा की त्यानंतर मंडल विरूद्ध कमंडल हा वाद कुणी चालू केला हे समस्त देशाला ठाऊक आहे, असा टोला रूपाली चाकणकर यांनी भाजपला लगावला आहे. त्या काळी OBC आरक्षणाला विरोध करणारे लोक आज OBC समाजाचा खोटा कळवळा आणून महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करत आहेत. “अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है!”, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.
त्या काळी OBC आरक्षणाला विरोध करणारे लोक आज OBC समाजाचा खोटा कळवळा आणून महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन करत असल्याचं समजलं.
"अरे भाई हिप्पोक्रसी की भी सीमा होती है !!"
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) June 26, 2021
आज राज्यभरातल्या महत्वाच्या शहरात ही आंदोलनं भाजप नेत्यांच्या नेतृत्वात केली जात असून, जाम आंदोलनासोबतच भाजपकडून राज्यभरात जेलभरो आंदोलन देखील करण्यात येत आहे. नागपुरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे, याचवेळी पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांना ताब्यात घेतले असून, आंदोलनातला जोर कमी करण्याचा प्रयत्न केला, मात्र या अटकेनंतरही या आंदोलनातला जोर तसूभरही कमी झालेला पाहायला मिळालेला नाही.
Read Also :
- यांच्या बायकांनी यांना मारलं, तरी ते मोदीजींनी केलं असं म्हणतील – देवेंद्र फडणवीस
- “खडसे, मुंडे, तावडेंची ‘…याद करो कुर्बानी’, भाजपच्या बॅनरबाजीला काँग्रेसने लावले ‘गालबोट’
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला सुरूवात
- समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
- अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक