नागपूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील राजकीय ओबीसी आरक्षण, सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, आज भाजपकडून रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्यात येत आहे. भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्का जाम आंदोलन करण्यात येत असून, नागपूरमध्येही भाजपने चक्का जाम आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणापुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले असून, यामुळे ओबीसींचे मोठे राजकीय नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून हे, चक्का जाम आंदोलन आज राज्यभरात ठिकठिकाणी करण्यात येत आहे.
समाजावर अन्याय करताना ठाकरे सरकारला लाज वाटायलां पाहिजे – पंकजा मुंडे
दरम्यान, नागपूरमध्ये या आंदोलनाला काँग्रेसने वेगळेच वळण दिले असून, युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, “एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, आणि विनोद तावडे या ओबीसी नेत्यांसोबत भाजपने काय केलं?” असा सवाल करत भाजपच्या बॅनरवर बॅनर लावून पेचप्रसंग निर्माण केला आहे. नागपूरच्या ‘व्हरायटी चौक’ इथं भाजपकडून चक्का जाम आंदोलन केलं जात आहे. यावेळी हा प्रकार घडला असून, इथल्या उड्डाणपुलावर भाजपने चक्का जाम आंदोलनाचे मोठे बॅनर लावले होते. या बॅनरवर युवक काँग्रेसकडून अशाप्रकारचे बॅनर लावून, या नेत्यांच्या फोटोवर ‘जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बांनी’ असा मजकूर लिहिला होता.
अवघ्या काही मिनिटातच विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर आशिष शेलारांना अटक
विशेष म्हणजे, भाजपचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात, व्हरायटी चौकात हे चक्काजाम आंदोलन होत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणावर भाजपचे कार्यकर्ते याठिकाणी आंदोलनाला जमले होते. दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी, हे बॅनर पाहिल्यावर, पुलावर जाऊन तातडीने हे बॅनर हटवले. तसेच, पोलिसांनी आता हे बॅनर जप्त केले असून, घडलेल्या प्रकारामुळे इथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
Read Also :
- पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या चक्काजाम आंदोलनाला सुरूवात
- सरकारचे डोळे उघडले नाही तर वारंवार आंदोलन करावं लागेल!
- एकेकाळी आरक्षणाचे विरोध करणारे लोक आज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत आहेत – धनंजय मुंडे
- भाजपाकडून राज्यभरात ठिकठिकाणी चक्का जाम आंदोलनास सुरुवात
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स; अकरा वाजता कार्यालयात हजर राहण्याचे आदेश